अस्मानी संकटामुळे कातावलेल्या शेतकऱ्यांसाठी सराकरने किसान क्रेडिट कार्डची योजना आणली. या योजनेद्वारे कमी व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज उपलबद्ध होते. शिवाय अनेक सुविधाही मिळतात. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपुरक व्यवसायांसाठी फक्त चार टक्के व्याजाने कर्ज मिळते. पंतप्रधान किसान योजनेतील सर्व शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डचा लाभ मिळतोय.
किसान क्रेडिट कार्डसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. अवकाळी आणि दुष्काली परिस्थितीत खचलेला शेतकरी अनेकवेळा खासगी सावकराकडे कर्जासाठी जातो. त्यातून शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्यासारख्या गोष्टी करतो. मात्र, कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करुन देत सराकरनं शेतकऱ्यांसाठी चांगलं कार्य केलं आहे. पण अनेकवेळा किसान क्रेडिट कार्ड असून आणि पात्र असतानाही कर्ज उपलब्ध होत नाही, किंवा दिलं जात नाही. अशावेळी काय करायचं? अशावेळी शेतकऱ्यांनी घाबरुन जायचं नाही. सरकारनं यासाठीही सुविधा करुन ठेवली आहे.
शेतकऱ्यांनी पीएम किसान हेल्पलाइन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवायची आहे. 011-24300606 या क्रमांकावर फोन करुन तुम्ही मत मांडू शकता किंवा समस्या सांगू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या मेल आयडीवरही तुम्ही तक्रार करु शकता. तक्रार केल्यानंतर तुम्हाच्या अडचणीवर योग्य ती दखल घेऊन कारवाई केली जात. त्यामुळे तुमचं समाधान होईल.
किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अल्पमुदतीचं कर्ज मिळणार शिवाय पशू-मत्स्यपालनासाठीही कर्ज मिळेल. त्याशिवाय क्रेडिट कार्डसोबत दोन लाखांचं विमा कवचही उपलबद्ध आहे. विम्यासाठी २२ ते ३३० रुपयांचा माफक हप्ता भरावा लागतो. या कार्डसोबत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत अपघात विमाही मिळतो.