scorecardresearch

भोपळी मिरचीच्या तळाला किती टोकं आहेत यावरून ठरतो गोडवा; एका नजरेत कशी कराल योग्य निवड?

Did You Know: वनस्पतिशास्त्रज्ञ जेम्स वोंग यांनी २०१८ मध्ये गार्डियनमध्ये याविषयी माहिती दिली होती ज्यानुसार, भोपळी मिरचीच्या तळाला असणाऱ्या टोकावरून…

Video How To Choose Best Capsicums As Per Lobes At The Bottom Which Shows Gender Sweetness And Quality Did You Know
भोपळी मिरचीच्या तळाला किती टोकं आहेत यावरून ठरतो गोडवा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Capsicums Facts: भोपळी मिरचीच्या तळाला असणाऱ्या उभट टोकावरून त्याची गोडी आणि लिंग ओळखणे शक्य असते असे सांगणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वनस्पतिशास्त्रज्ञ जेम्स वोंग यांनी २०१८ मध्ये गार्डियनमध्ये याविषयी माहिती दिली होती ज्यानुसार, भोपळी मिरचीच्या तळाला असणाऱ्या टोकावरून वेगवेगळ्या प्रकारची माहिती ओळखता येते, जी नियमित स्वयंपाक करताना तुम्हालाही फायदेशीर ठरू शकते.

भोपळी मिरचीला असणारे तीन किंवा चार टोकं असतात. या संख्येनुसार भोपळी मिरचीचा गोडपणा आणि परिपक्वता ओळखता येते. भोपळी मिरचीचा गोडपणा सहसा ती किती पिकलेली आहे यावरही अवलंबून असतो, याचा अर्थ लाल मिरची हिरव्या मिरचीपेक्षा गोड असू शकते.

याशिवाय काही अभ्यासात समोर असलेल्या माहितीनुसार, चार टोकं असणाऱ्या मिरचीमध्ये जास्त बिया असू शकतात व या मिरच्या तुलनेने गोड असून सॅलडसाठी किंवा सँडविचसाठी वापरल्या जाऊ शकतात. दुसरीकडे तीन टोकं असणाऱ्या मिरच्या या भाजी किंवा शिजवण्याच्या रेसिपी मध्ये वापरल्या जाऊ शकतात.

हे ही वाचा<< ‘अनुपमा’ फेम नितेश पांडे यांच्या मृत्यूनंतर हृदयविकाराने वाढवली चिंता; तज्ज्ञांकडून जाणून घ्या लक्षणे, टेस्ट व धोक्याची कारणे

दरम्यान, राऊटर्सने केलेल्या एका संशोधनात एक विशेष माहिती समोर आली आहे. या संशोधनानुसार, ज्या फुलापासून भोपळी मिरची तयार होते त्या फुलांचे भाग नर किंवा मादी असतात, परंतु मिरचीची ओळख नसते असे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 11:12 IST

संबंधित बातम्या