लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकांचा पहिला निकाल अवघ्या काही तासांमध्ये हाती येईल. मात्र आज सकाळपासून सोशल नेटवर्किंग साईट्सवर या निकालांचीच चर्चा पहायला मिळत आहेत. फेसबुक, ट्विटरबरोबरच इन्स्ताग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवरही निवडणुकांच्या निकालाचीच चर्चा आहे. ट्विटरवर तर #ModiAaRahaHai विरुद्ध #आ_रही_है_कांग्रेस हॅशटॅग युद्धच समर्थकांनी सुरु केले आहे.

ट्विटरवरील सर्व टॉप ट्रेण्ड्स हे निवडणुकांच्या निकालासंदर्भातीलच आहेत. यामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा हॅशटॅग आहे #ElectionResults2019. काल रात्रीपासूनच #ElectionResults2019 हा हॅशटॅग भारतामध्ये ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंग हॅशटॅग ठरला आहे. हा हॅशटॅग वापरून मागील काही तासांमध्ये ४४ हजारांहून अधिक ट्विटस करण्यात आले आहेत. त्याचबरोबर #Verdict2019, #आ_रही_है_कांग्रेस, #ModiAaRahaHai, #CountingDay, #GobackModi हे हॅशटॅगही ट्रेण्ड होताना दिसत आहेत. एकंदरितच सोशल नेटवर्किंगवर पहिला निकाल हाती येण्याआधीच समर्थकांनी आणि विरोधकांनी एकमेकांना लक्ष्य केलं आहे.

दिवसभरामध्ये निकाल समोर येतील त्याप्रमाणे वेगवेगळे विषय ट्विटर तसेच फेसबुकवर ट्रेण्ड होताना दिसतील.