अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीमधील सदस्य पक्ष असला तरा बच्च कडूंचा गेल्या काही महिन्यांपासून महायुतीशी संघर्ष चालू आहे. कडू यांनी भारतीय जनता पार्टीवरील त्यांची नाराजी सातत्याने बोलून दाखवली आहे. भाजपा महायुतीतल्या छोट्या पक्षांना योग्य पद्धतीने वागवत नसल्याचा आरोपही कडू यांनी अनेक वेळा केला आहे. तसेच अमरावतीत बच्चू कडू आणि विद्यमान खासदार तथा भाजपाच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत रणा यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. भाजपाने नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देताना मित्रपक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी अमरावतीत प्रहारकडून दिनेश बूब यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. अमरावतीत नवनीत राणा, त्यांचे पती आणि बडनेराचे आमदार रवी राणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचा प्रचार करत आहेत. तर बच्चू कडू हे दिनेश बूब यांचा प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, राणा दाम्पत्य बच्चू कडूंवर आणि बच्चू कडू राणा दाम्पत्यावर टीका करत आहेत.
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
आमदार रवी राणा यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारादरम्यान प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्यावर टीका केली होती. या टीकेला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-04-2024 at 17:37 IST
TOPICSअमरावतीAmravatiनवनीत राणाNavneet Ranaबच्चू कडूBachchu Kaduरवी राणाRavi Ranaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
+ 1 More
मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu warns ravi rana if we share your private information you will hurt asc