चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांचं आव्हान असणार आहे. आज पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदानला सुरुवात झाल्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी आपलं मतदान केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यांत बाळू धानोरकर यांच्या आठवणीने अश्रू तरळले.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचाही आहे. आणि एका बाजूला माझ्यासाठी दुःखाचा दिवसही आहे. कारण प्रत्येकवेळी मी आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर येथे जोडीने मतदान करायचो. आज त्यांची उणीव जाणवत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या उत्सवात आनंदाने सामील झालं पाहिजे. या उत्सवात सामील होऊन खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मान ठेवला पाहिजे.

What Sanjay Raut Said?
संजय राऊत यांचा गंभीर आरोप, “अजित पवार धमकी बहाद्दर, रोज उठून…”
narendra modi p chidambaram
“आम्ही लोकांच्या जमिनी, सोनं मुसलमानांमध्ये वाटू असं…” चिदंबरम यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
ramdas athawale marathi news
Video: “गावागावात विचारत आहेत म्हातारी, शरद पवार…”, रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; फडणवीसांनी लावला डोक्याला हात!
tamil nadu lok sabha elections 2024 fact check dmk leader distributing gifts as part of new year celebrations falsely linked to polls
मतदानाच्या दोन आठवडे आधी द्रमुकच्या नेत्याचं पैसे वाटप? Video व्हायरल, पण नेमकं सत्य काय? वाचा…

हेही वाचा >> Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : देशभर मतदानाला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीतून खास आवाहन

“बाळू धानोरकर माझ्याबरोबर १८ वर्षे होते. शरीराने ते माझ्याबरोबर नसले तरीही मनाने ते माझ्याबरोबर आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. मला विश्वास आहे की मी १०० टक्के विजयी होईन”, असं म्हणत असताना त्या भावूक झाल्या. डोळ्यांतील अश्रू पुसत त्यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केलं.

त्या पुढे म्हणाल्या, आपल्या भागात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा आहे, अशातही मतदान करणं आपला नैतिक अधिकार आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपला अधिकार बजवावा असं मी आवाहन करते.

हेही वाचा >> चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सुधीर मुनगंटीवार-प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत

अटीतटीची लढत

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान आहे. मुनगंटीवार सलग सहा वेळा निवडून येणारे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी १९९९ मध्ये सहा महिन्यांसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम केले आहे. त्यानंतर २०१४ मध्ये राज्याचे अर्थमंत्री म्हणून यशस्वी काम केले. आता मुनगंटीवार वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत. धानोरकर आमदार आहेत. त्यामुळे या लढाईत मंत्री बाजी मारतो की आमदार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरळ लढत ही काँग्रेससाठी फायद्याची व भाजपासाठी नुकसानीची आहे. मात्र, यावेळी भाजपने मुनगंटीवार यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने लढत रंगतदार होणार आहे.

२०१९ मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर विरुद्ध सुरेश उर्फ बाळू धानोरकर अशी लढत झाली. धानोरकर यांनी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रचार यंत्रणा राबवून अहीर यांचा ४४ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता.