रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : तिसरा उमेदवार दमदार नसल्याने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात विद्यमान वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आमदार प्रतिभा धानोरकर, अशी सरळ लढत होणार आहे. येथे प्रथमच मंत्री विरुद्ध आमदार अशी लढत होत असून महायुती व महाविकास आघाडीचे नेते प्रचाराला लागले आहेत. अन्य उमेदवारांना निवडणूक चिन्हांची प्रतीक्षा आहे.

Controversial statements of Deputy Chief Minister Ajit Pawar again
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये; तीव्र प्रतिक्रिया उमटताच सारवासारव
amit shah
महाराष्ट्राला काय दिले, पवारांनीच हिशेब द्यावा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !

बुधवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६ उमेदवारांनी एकूण ४८ नामनिर्देशनपत्र दाखल केले. अर्ज छाननीत २१ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र रद्द झाल्याने १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यातच खरी लढत आहे.

आणखी वाचा-वर्धा : शरद पवार काँग्रसचे माजी आमदार अमर काळेंना म्हणाले, ‘थोडे थांबा….’

वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेले व बहुजन समाज पक्षाच्या वतीने राजेंद्र रामटेके, विद्यासागर कालिदास कासर्लावार यांनी भीमसेना पक्षाच्या वतीने, नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी), पुर्णिमा दिलीप घनमोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), मिलिंद प्रल्हाद दहिवले (अपक्ष), सेवकदास कवडूजी बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, डेमक्रेटीक), वनिता जितेंद्र राऊत (अखील भारतीय मानवता पक्ष), विकास उत्तमराव लसंते (सन्मान राजकीय पक्ष), संजय नीलकंठ गावंडे (अपक्ष), दिवाकर हरीजी उराडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), अशोक राठोड (जय विदर्भ पार्टी) या १५ उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहे.

सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. यापूर्वी या लोकसभा मतदार संघात मंत्री विरुद्ध आमदार, अशी लढत झालेली नाही. १९९६ मध्ये माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे व हंसराज अहीर यांच्यात लढत झाली होती. तेव्हा अहीर जिंकले होते, तर १९९८ मध्ये माजी खासदार नरेश पुगलिया व खासदार हंसराज अहीर अशी लढत झाली होती. यात पुगलिया विजयी झाले होते. तेव्हा दोघेही मंत्री नव्हते. त्यानंतर १९९९ मध्ये खासदार पुगलिया व हंसराज अहीर अशी लढत झाली, तेव्हा पुगलिया जिंकले होते. मात्र तेव्हा पुगलिया अथवा अहीर मंत्री नव्हते. २००४ मध्ये झालेल्या लढतीत अहीर यांनी पुगलिया यांचा पराभव केला होता. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा पुगलिया विरुद्ध अहीर या लढतीत अहीर विजयी झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मात्र अहीर यांनी तेव्हा मंत्री देवतळे यांचा पराभव केला होता.

आणखी वाचा-नवनीत राणा प्रकरणी खोटा दावा; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून आचारसंहितेचा भंग

२०१९ मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर विरुद्ध सुरेश उर्फ बाळू धानोरकर अशी लढत झाली. धानोरकर यांनी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रचार यंत्रणा राबवून अहीर यांचा ४४ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान आहे. मुनगंटीवार सलग सहा वेळा निवडून येणारे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी १९९९ मध्ये सहा महिन्यांसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम केले आहे. त्यानंतर २०१४ मध्ये राज्याचे अर्थमंत्री म्हणून यशस्वी काम केले. आता मुनगंटीवार वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत. धानोरकर आमदार आहेत. त्यामुळे या लढाईत मंत्री बाजी मारतो की आमदार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरळ लढत ही काँग्रेससाठी फायद्याची व भाजपसाठी नुकसानीची आहे. मात्र, यावेळी भाजपने मुनगंटीवार यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने लढत रंगतदार होणार आहे.