निश्चलीकरणानंतर देशात रोख पैशांचे व्यवहार कमी होतील आणि भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होईल असं बोललं गेलं. मात्र, नुकत्याच देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये हा दावा फोल ठरलाय. निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची रोकड, ड्रग्ज आणि दारू जप्त केली आहे. त्यामुळे निवडणुकीत या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचं उघड झालंय.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधून १०९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशमधून ८ लाख लीटर दारू जप्त झाली आहे. २०१७ आणि २०२२ ची तुलना केली असता कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात जवळपास चारपट वाढ झालीय. २०१७ मध्ये निवडणूक आयोगाने एकूण २९९ कोटी ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. १०१८ कोटीवर गेलाय.

nine lakh temporary jobs due to Lok Sabha election
लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास नऊ लाख तात्पुरत्या नोकऱ्या, कसा मिळणार रोजगार?
voter lists, Chandrapur,
जिवंत व्यक्ती मृत अन् मृत व्यक्ती जिवंत! चंद्रपुरात मतदार याद्यांचा गोंधळ, नावे नसल्याने मतदार संतप्त
Women Voters in India
निवडणूक आयोगाने ‘तो’ कठोर निर्णय घेतला आणि महिला मतदारांची संख्या वाढली
mahayuti and maha vikas aghadi face problem with alliance partner over seat sharing issue
विश्लेषण : राज्यात दोन्ही आघाड्यांची कोंडी का होत्येय? विधानसभेच्या गणितांमुळे लोकसभेच्या जागावाटपात अडचण? 

पंजाबमधून सर्वाधिक साहित्य जप्त

निवडणूक होत असलेल्या पाच राज्यांपैकी पंजाबमध्ये सर्वाधिक साहित्य जप्त करण्यात आलंय. पंजाबमध्ये ५१० कोटी रुपयांची रोख रक्कम, ड्रग्ज, दारू आणि इतर बेकायदेशीर साहित्य जप्त करण्यात आलं. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ३०७ कोटी ९२ लाख रुपयांची रोख रक्कम, मणिपूरमध्ये १६७ कोटी ८३ लाख, गोव्यात १८ कोटी ७३ लाख आणि उत्तराखंडमध्ये १२ कोटी ७३ लाख रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

हेही वाचा : UP Election: लखीमपूरमध्ये EVM मध्ये टाकलं फेविक्विक, सपाचं बटण अडकलं; निवडणूक आयोगाकडे तक्रार

८२ लाख लीटर दारू जप्त

२०२२ मध्ये ५ राज्यांच्या निवडणुकीत १४० कोटी २९ लाख रुपयांसह तब्बल ८२ लाख लीटर दारू देखील जप्त करण्यात आलीय. या दारूची किंमत ९९ कोटी रुपये इतकी आहे. हे सर्व साहित्य निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरलं जाणार होतं.