मध्य प्रदेशमध्ये २०१८ दरम्यान दीड वर्षांचा अपवाद सोडला, तर २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी तब्बल १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये सत्ताविरोधी भावना असल्याची जोरदार चर्चा होती. एग्झिट पोलनेही मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला अनुकुल अंदाज वर्तवले होते. मात्र, प्रत्यक्षात रविवारी (३ डिसेंबर) मतमोजणीच्या दिवशी सर्व अंदाज चुकीचे ठरले. मध्य प्रदेशच्या जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत दिलं. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

कमलनाथ सिंह म्हणाले, “या लोकशाहीच्या सामन्यात आम्ही मध्य प्रदेशच्या जनतेचा निर्णय स्वीकार करतो. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमचं काम करत राहू. आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे तरुणांचं भविष्य, बेरोजगारी आणि शेतीवरील संकट. आपल्या अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा ७० टक्के आहे. शेती क्षेत्र मजबूत व्हावं याला आपलं प्राधान्य असलं पाहिजे.”

What Supriya Sule Said About Sharad Pawar?
“शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं हा अदृश्य शक्तीचा..”, सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

हेही वाचा : Madhya Pradesh Election Result 2023 Live : भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब

“आमच्यात काय कमतरता याचं आत्मपरिक्षण करू”

“आम्ही या निवडणुकीच्या निकालावर विचार करू. आमच्यात काय कमतरता आहेत याचं आत्मपरिक्षण करू. आम्ही मतदारांना आमचं म्हणणं का समजून सांगू शकलो नाही, यावर चर्चा करू. उमेदवार जिंकलेला असो, अथवा पराभूत झालेला असो; सगळ्यांशी चर्चा करू. त्या चर्चेनंतर आम्ही या निकालाचा निष्कर्ष काढू,” असं मत कमलनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.