scorecardresearch

Premium

Video: निकालाच्या सहा दिवस आधीच उघडल्या मतपेट्या! मध्य प्रदेशमधला व्हिडीओ व्हायरल; काँग्रेसचा तीव्र आक्षेप

सोशल मीडियावर मतपेट्या उघडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून विरोधकांनी त्यावरून टीका करायला सुरुवात केली आहे.

madhya pradesh election (1)
मध्य प्रदेश निवडणूक निकालाआधीच Video व्हायरल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या महिन्याभरापासून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या राज्यांमध्ये हे मतदान चालू आहे. तेलंगणामधील मतदान शेवटच्या टप्प्यात होणार असून ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. मात्र, त्याच्या सहा दिवस आधीच एका केंद्रावर मतपेट्या उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतला आहे.

पाच राज्यांमध्ये मध्य प्रदेशसाठीही मतदान पार पडलं असून ३ डिसेंबर रोजी निकाल अपेक्षित आहे. मात्र, मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात निकाल लागण्याच्या सहा दिवस आधी म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजीच स्थानिक तहसील कार्यालयातील स्ट्राँग रुम उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसकडून या प्रकाराचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Babar Azam warning to throw a bottle Video Viral
Babar Azam : प्रेक्षकांच्या ‘झिम्बाबर-झिम्बाबर’च्या घोषणांनी बाबर संतापला, बाटली फेकून मारण्याचा दिला इशारा, पाहा VIDEO
women murdered in Kenya
विश्लेषण : केनियात महिलांच्या इतक्या प्रमाणात हत्या का होताहेत? काय आहे ‘डार्क व्हॅलेंटाइन’ चळवळ?
do Vyaghrasana know its health benefits
Vyaghrasana Yoga : तासन् तास बसून काम करत असल्यामुळे पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास वाढलाय? मग व्याघ्रासन योगा करा
Women Climb On Ac To Watch Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui Video Viral on social media
व्वा दिदी व्वा…! मुन्नवरला पाहण्यासाठी महिलेनं काय केलं पाहा; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

“निवडणूक प्रक्रियेलाच बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डाग लावला आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाटचे जिल्हाधिकारी डॉ. गिरीश मिश्रांनी २७ नोव्हेंबर रोजीच स्ट्राँग रुम उघडून उमेदवारांना कल्पना न देताच मतपेट्या उघडल्या आहेत. शेवटच्या घटका मोजणारं शिवराज सिंह सरकार आणि अंधभक्तीमध्ये आकंठ बुडालले जिल्हाधिकारी लोकशाहीसाठी धोका आहेत. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं सतर्क राहावं. भाजपाच्या पराभवाच्या भीतीने सैरभैर झालेलं हे सरकार आणि काही सरकारी दलाल मतं चोरण्याच्या प्रयत्नात आहेत”, असं काँग्रेसनं एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये काही लोक खाली बसून पोस्टल मतांची पाकिटं हाताळत असल्याचं दिसत आहे. शिवाय दुसरीकडे या पाकिटांचे गठ्ठे करून एका कापडी पिशवीत भरले जात आहेत. काही लोक या सगळ्या प्रकाराचं व्हिडीओ शूटिंग करत असून “आम्हाला न बोलवता, न कल्पना देता तु्म्ही परस्पर स्ट्राँग रुम कशी उघडलीत?” असा प्रशन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

Assembly Polls 2023: कल्याणकारी योजना, हिंदुत्व आणि ओबीसी मुद्दा; काँग्रेस-भाजपा यांचे प्रचारातील मुद्दे समान कसे?

दरम्यान, स्थानिक अधिकारी गोपाल सोनी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. स्थानिक तहसिलदार कार्यालयातील एक खोली स्ट्राँग रुम केली असून त्यातच सर्व पोस्टल मतपेट्या ठेवल्या आहेत. आमच्याकडे रोज ऑनलाईन पोस्टल बॅलेट पद्धतीने आलेल्या मतांची पाकिटं येतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रुम उघडण्याच आली होती. त्यानंतर सर्व पाकिटांची प्रत्येक मतदारसंघनिहाय ५० मतांच्या गठ्ठ्यामध्ये वर्गवारी करण्यात आली”, असं ते म्हणाले.

Live Updates

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Postal ballet strong room opened in madhya pradesh congress shares video pmw

First published on: 28-11-2023 at 13:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×