भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये ऐतिहासिक कामगिरी रचत इतिहास रचला. ४०३ पैकी ३२५ जागांवर विजय मिळवून देशातील सर्वात मोठ्या विधानसभेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसले होते. त्यांच्या या परिश्रमामुळे उत्तर प्रदेशात कमळ उमलले असे म्हटले जात आहे तर समाजवादी-काँग्रेसच्या आघाडीला जनतेने नापसंत केल्याची चित्र पाहायला मिळाले आहे.

alia bhatt met gala look 2024
Met Gala : तब्बल १९६५ तास, १६३ कारागीर अन्…; मेट गालामध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज! साडीने वेधलं लक्ष
On Camera, UP Teen Collapses, Dies While Dancing At Her Sister's Wedding shocking video
Shocking Video: तिची चूक नसेलही, पण मृत्यूने तिला अवघ्या ७ सेकंदात कवटाळलं; उत्तर प्रदेशमधला VIDEO व्हायरल
Krushna Abhishek Kashmera Shah kissed in front of camera in arti singh sangeet video viral
बहीण आरती सिंहच्या संगीतदरम्यान कृष्णा अभिषेक-कश्मीरा शाहने केलं किस; व्हिडीओ व्हायरल
thipkyanchi rangoli fame chetan vadnere and rujuta dharap wedding photos
आईने केलं लाडक्या लेकीचं कन्यादान! चेतन-ऋजुताच्या लग्नातील ‘तो’ फोटो चर्चेत, सर्वत्र होतंय कौतुक

उत्तर प्रदेशात तिरंगी लढत पाहायला मिळाली. अखिलेश आणि मुलायमसिंह यादव यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना अपयश आले. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेस आणि मायावती यांच्या बहुजन समाज पक्षासाठी ही अस्तित्वाची निवडणूक होती परंतु त्यांना आपला करिश्मा दाखवता आला नाही.

उत्तर प्रदेशचे सारे राजकारण हे जातीच्या आधारावर चालते. २० ते २१ टक्के दलित, ५० टक्के इतर मागासवर्गीय, १५ ते १७ टक्के मुस्लिम, १० टक्के ब्राह्मणसह ठाकूर व अन्य काही समाज महत्त्वाचे आहेत. ही मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न समाजवादी पक्ष, मायावतींचा बसप, भाजप आणि काँग्रेसने आपल्या प्रचारसभांतून केला. समाजवादी पक्षाची मदार ही सुमारे नऊ टक्के यादव मतांसह अन्य काही जाती तसेच मुस्लिम मतांवर होती. तर मायावतींना दलित आणि मुस्लिम मतदार किती साथ देतील, अशी आशा होती. तर भाजपचा भर ब्राह्मण, ठाकूर यांसह मतांच्या ध्रुवीकरणावर होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचारात समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि राहुल गांधींना लक्ष्य केले. तर अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फैरी झाडल्या.

‘मन की बात नको, काम की बात’ करा, असे अखिलेश आपल्या प्रचारसभांतून सुनावत होते. तर पंतप्रधान मोदींसह भाजपच्या नेत्यांनी अखिलेश यादव यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले. विशेष म्हणजे या दोघांच्या प्रचार लढाईत मायावती यांनी दोघांनाही लक्ष्य करत ‘सोशल इंजिनीअरिंग’वर भर दिल्याचे दिसले.

जनमत चाचण्यांमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला जनता कौल देईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होते. तर त्याखालोखाल भाजपला पसंती दिली होती. न्यूज २४ इंडियाने वर्तवलेल्या अंदाजात आघाडीला १९१ जागा मिळतील, असा अंदाज होता. तर त्यापाठोपाठ भाजपला १२०, बसपला ७६ जागा मिळतील, असा अंदाज होता. एबीपी न्यूज – लोकनिती – सीएसडीएसने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बसपला ७६ ते ८६ जागा मिळतील असे म्हटले होते. तर भाजपला ११८-१२८, समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीला सर्वाधिक १८७-१९७ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. टाईम्स नाऊ आणि व्हीएमआरनेही जनमत चाचणी केली असून, त्यात समाजवादी पक्षाला १४७ जागांवर विजय मिळणार असे भाकीत करण्यात आले होते. तर भाजपला तब्बल २०२ जागा मिळतील आणि पक्ष सत्तेत बसेल, असा अंदाज वर्तवला आहे.

२०१२ मधील विधानसभा निवडणुकीत सत्तेत असलेल्या बसपला मोठा धक्का बसला होता. समाजवादी पक्षाच्या लाटेत बसप सत्तेपासून दूर फेकला गेला होता. बसपचे ४०३ पैकी केवळ ८० उमेदवार निवडून आले होते. २००७ च्या तुलनेत बसपला १२६ जागा गमवाव्या लागल्या होत्या. याउलट समाजवादी पक्षाने जोरदार मुसंडी मारली होती. त्यांनी तब्बल २२४ जागा जिंकल्या. २००७ च्या तुलनेत पक्षाने १२७ जागा अधिक जिंकल्या होत्या.

भाजपचे खूप काही नुकसान झाले नव्हते. त्यांनी ४७ जागा जिंकल्या होत्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांना ४ जागांवर नुकसान सोसावे लागले होते. काँग्रेसने २८ जागा जिंकल्या. तर रालोद ९, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि १९ जागा अपक्षांसह इतरांनी जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाला २९.१५ टक्के मते म्हणजेच पहिल्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर २५.९१ टक्के मते मायावतींच्या बसपला मिळाली होती. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी देशभर गुजरात मॉडेलचा प्रचार केला आणि त्याला उत्तर प्रदेशने सर्वाधिक पसंती दिली. राज्यातील ८० पैकी ७१ जागा जिंकल्यामुळे लोकसभेत भाजपला बहुमताची लॉटरी लागली होती. त्याच यशाची पुनरावृत्ती या निवडणुकीतही झालेली पाहायला मिळाली.

२०१२ मधील निवडणुकीत विजयी उमेदवारांची नावे (पक्ष व मतदारसंघ) पुढीलप्रमाणे:

महावीर सिंग राणा (बसप, बेहात)
धरम सिंग सायनी (बसप, नकुर)
राघव लखनपाल (भाजप, सहारनपूर नगर)
जगपाल (बसप, सहारनपूर)
राजेंद्र सिंग राणा (सप, देवबंद)
रविंदर कुमार मोल्हू (बसप, रामपूर मनिहारन)
प्रदीप कुमार (काँग्रेस, गंगोह)
हुकुम सिंग (भाजप, कैराना)
सुरेश कुमार (भाजप, थाना भवन)
पंकज कुमार मलिक (काँग्रेस, शामली)
नवाझिश आलम खान (सप, बुधाना)
नूर सलीम राणा (बसप, चरथावल)
अनिल कुमार (बसप, पुरकाजी)
चित्तरंजन स्वरुप (सप, मुझफ्फर नगर)
करतार सिंग भडाना (रालोद, खतौली)
जामिल अहमद कस्मी (बसप, मिरपूर)
तस्लीम (बसप, नझियाबाद)
मनोज कुमार पारस (सप, नगीना)
मोहम्मद गाझी (बसप, बारहपूर)
मुलचंद चौहान (सप, धामपूर)
ओम कुमार (बसप, नेहातौर)
कुंवर भारतेंद्र (भाजप, बिजनोर)
इक्बाल (बसप, चांदपूर)
लोकेंद्र सिंग (भाजप, नूरपूर)
अनिसुरेहमान (इतर, कांठ)
कुंवर सर्वेश कुमार (भाजप, ठाकुरद्वारा)
शमिमुल हक (सप, मुरादाबाद ग्रामीण)
मोहम्मद युसूफ अन्सारी (सप, मुरादाबाद शहर)
मोहम्मद रिझवान (सप, कुंडर्की)
मोहम्मद इरफान (सप, बिलारी)
लक्ष्मी गौतम (सप, चंदौसी)
पिंकी सिंग (सप, अस्मोली)
इ्क्बाल मेहमूद (सप, संभल)
नवाब कझीम अली खान (काँग्रेस, सौर)
अली युसूफ अली (बसप, चमरौआ)
संजय कपूर (काँग्रेस, बिलासपूर)
मोहम्मद आझम खान (सप, रामपूर)
विजय सिंह (सप, मिलाक)
मायकल चंद्रा (सप, धनौरा)
अश्फाक अली खान (सपा, नौगवां सादत)
मेहबूब अली (सप, अमरोहा)
कमाल अख्तर (सप, हसनपूर)
गुलाम मोहम्मद (सप, सिवाल खास)
संगीत सिंग सोम (भाजप, सरधना)
प्रभू दयाल वाल्मिकी (सप, हस्तीनापूर)
शाहिद मंजूर (सप, किथोर)
सत्यप्रकाश अग्रवाल (भाजप, मेरठ शहर)
डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयी (भाजप, मेरठ)
रवींद्र बंधना (भाजप, मेरठ दक्षिण)
वीर पाल (रालोद, चपरोली)
लोकेश दीक्षित- (बसपा, बरौत)
हेमलता चौधरी- (बसपा, बाघपत)
झाकिर अली- (बसपा, लोणी)
वाहब- (बसपा, मुरादनगर)
अमरपाल- (बसपा, साहिबाबाद)
सुरेश बंसल- (बसपा, गाझियाबाद)
सुदेश शर्मा- (रालोद, मोदी नगर)
धर्मेशसिंग तोमर- (सपा, ढोलना)
गजराज सिंग- (काँग्रेस, हपुर)
मदन चौहान- (सपा, गरमुक्तेश्वर)
महेश कुमार शर्मा- (भाजप, गुरुग्राम)
सतवीरसिंग गुर्जर- (बसपा, दाद्री)
वेदराम भाटी- (बसपा, जेवर)
बिमला सिंग सोलंकी- भाजपा, सिकंदराबाद)
मोहम्मद अलीम खान- (बसपा, बुलंदशहर)
दिलनवाझ खान- (काँग्रेस, स्याना)
गजेंद्र सिंग- (बसपा, अनुपशहर)
भगवान शर्मा- (सपा, देबाई)
मुकेश शर्मा- (सपा, शिखरपूर)
बंशीसिंग पहाडिया- (काँग्रेस, खुर्जा)
भगवती प्रसाद- (रालोद, खैर)
दलवीर सिंग- (रालोद, बरौली)
विरेश यादव- (सपा, अत्रौली)
राकेश कुमार- (सपा, छर्रा)
झहीर उलाह खान- (सपा, कोइल)
झाफर आलम- (सपा, अलीगढ)
त्रिलोकी राम- (रालोद, इगलस)
देवेंद्र अग्रवाल- (सपा, सदाबाद)
रामवीर उपाध्याय- (बसपा, सिकंदरा राव)
तेजपाल सिंग- (रालोद, छता)
जयंत चौधरी- (रालोद, मंत)
राजकुमार रावत- (बसपा, गोवर्धन)
प्रदीप माथुर- (काँग्रेस, मथुरा)
पूरन प्रकाश- (रालोद, बलदेव)
डॉ. धरमपाल सिंग- (बसपा, एत्मादपुर)
गुटीयारी लाल दुवेश- (बसपा, आग्रा शहर)
योगेंद्र उपाध्याय- (भाजप, आग्रा दक्षिण)
जगन प्रसाद गर्ग- (भाजप, आग्रा दक्षिण)
काली चरन सुमन- (बसपा, आग्रा ग्रामीण)
सुरजपाल सिंग- (बसपा, फतेहपुर सिक्री)
भगवानसिंग कुशवाह- (बसपा, खेरागड)
छोटेलाल वर्मा- (बसपा, फतेहबाद)
राजा महेंद्र अरीदमन सिंग- (सपा, बाह)
राकेश बाबु- (बसपा, तुंडला)
रामवीर सिंग- (सपा, जसरना)
मनिष असिझा- (भाजपा, फिरोझाबाद)
ओम प्रकाश वर्मा- (सपा, शिकोहाबाद)
हरीओम- (सपा, सिरसागंज)
मन पाल सिंग- (सपा, कासगंज)
ममतेश (बसप, अमनपूर)
नजीवा खान झीनत (सप, पतियाली)
रामेश्वर सिंह (सप, अलिगंज)
आशिष कुमार यादव (सप, इटाह)
अमित गौरव (सप, मारहरा)
रणजीत सुमन (सप, जालेसार)
राजकुमार उर्फ राजू यादव (सप, मैनपुरी)
अलोक कुमार (सप, भोनगाव)
ब्रजेश काथेरिया (सप, किशानी)
सोबारान सिंह यादव (सप, कारहाल)
रामखिलाडी सिंह यादव (सप, गन्नौर)
आशुतोष मौर्य उर्फ राजू (सप, बिसौली)
ओमकार सिंह (सप, सहास्वान)
मुस्सरत अली बित्तान (बसप, बिलसी)
अबीद रझा खान (सप, बदायूँ)
आशिष यादव (सप, शेखूपूर)
सिनोद कुमार शाक्य उर्फ दीपू (बसप, दतागंज)
अताउर रेहमान (सप, बहेरी)
सुलतान बेग (बसप, मिरागंज)
शाझिल इस्लाम (आयईएमसी, भोजीपुरा)
भागवत सरन गंगवार (सप, नवाबगंज)
डॉ. साईराम सागर (सप, फरीदापूर)
विरेंद्र सिंह (बसप, बिठारी चैनपूर)
डॉ. अरुण कुमार (भाजप, बरेली)
राजेश अगरवाल (भाजप, बरेली केंट)
धरमपाल सिंह (भाजप, ओनला)
रियाझ अहमद (सप, पिलिभीत)
हेमराज वर्मा (सप, बरखेरा)
पितम राम (सप, पुराणपूर)
अग्यस रामसरण वर्मा (भाजप, बिसालपूर)
राजेश यादव (सप, काटरा)
नीरज कुशवाह (बसप, जलालाबाद)
रोशन लाल वर्मा (बसप, तिहार)
शकुंतला देवी (सप, पोवायान)
सुरेश कुमार खन्ना (भाजप, शहाजहाँपूर)
राममूर्ती सिंह वर्मा (सप, दादराऊल)
हरविंदर कुमार सहानी (बसप, पालिआ)
अजय (भाजप, निघासन)
विनय तिवारी (सप, गोला गोक्रानाथ)
रामसरन (सप, श्रीनगर)
शमशेर बहादूर (बसप, धौरहरा)
उत्कर्ष वर्मा-मधूर (सप, लाखिमपूर)
सुनील कुमार लाला (सप, कास्ता)
अवस्थी बाला प्रसाद (बसप, मोहम्मदी)
अनुपकुमार गुप्ता (सप, माहोली)
राधेश्याम जैस्वाल (सप, सितापूर)
रामहेत भारती (बसप, हारगाव)
मोहम्मद जस्मिर अन्सारी (बसप, लहारपूर)
रामपाल यादव (सप, बिस्वान)
महेंद्र कुमार सिंह (सप, सेवता)
नरेंद्र सिंह वर्मा (सप, महम्मुदाबाद)
मनीष रावत (सप, सिधौली)
रामपाल राजवंशी (सप, मिसरिख)
रजनी तिवारी (बसप, सावैजपूर)
बाबू खान (सप, शाहाबाद)
नितीन अगरवाल (सप, हरदोई)
श्याम प्रकाश (सप, गोपामाऊ)
राजेश्वरी (सप, संदी)
ब्रिजेश कुमार (बसप, बिलग्राम-मल्लनवान)
अनिल वर्मा (सप, बालामाऊ)
कुंवर महाबीर सिंह (सप, संदीला)
बदलू खान (सप, बंगेरमाव)
सुधीर कुमार (सप, सफीपूर)
राधेलाल रावत (बसप, मोहान)
दीपक कुमार (सप, उन्नाव)
कुलदीप सिंह सेनगार (सप, भगवंतनगर)
उदय राज (सप, पूर्वा)
इंदल कुमार (सप, मलिहाबाद)
गोमती यादव (सप, बक्षी का तलाब)
शारदा प्रताप शुक्ला (सप, सरोजिनी नगर)
मोहम्मद रेहान (सप, लखनऊ पश्चिम)
अभिषेक मिश्रा (सप, लखनऊ उत्तर)
कालराज मिश्रा (भाजप, लखनऊ पूर्व)
रविदास मेहरोत्रा (सप, लखनऊ मध्य)
प्रो. रिटा बहुगुणा जोशी (काँग्रेस, लखनऊ केंट)
चंद्रा रावत (सप, मोहनलालगंज)
रामलाल अकेला (सप, बछरावण)
डॉ. मोहम्मद मुस्लिम (काँग्रेस, तिलोई)
सुरेंद्र विक्रम सिंह (सप, हरचंदपूर)
अखिलेश कुमार सिंह (इतर, रायबरेली)
आशाकिशोर (सप, सालोन)
देवेंद्र प्रताप सिंह (सप, सरेनी)
मनोज कुमार पांडे (सप, उंचाहार)
राधेश्याम (काँग्रेस, जगदीशपूर)
राकेश प्रताप सिंह (सप, गौरीगंज)
गायत्री प्रसाद (सप, अमेठी)
अबरार अहमद (सप, इसौली)
अनूप संदा (सप, सुलतानपूर)
अरुण कुमार (सप, सदार)
संतोष पांडे (सप, लांभुआ)
रामचंद्र चौधरी (सप, कादीपूर)
अजित कुमार (सप, कईमगंज)
नरेंद्र सिंह यादव (सप, अमरितपूर)
विजय सिंह /प्रेम सिंह (अपक्ष, फारुखाबाद)
जमालुद्दीन सिद्दीकी (सप, भोजपूर)
अरविंद सिंह यादव (सप, छिब्रामाव)
बैजल बहादूर पाल (सप, तिरवा)
अनिलकुमार दोहरे (सप, कनौज)
शिवपाल सिंह यादव (सप, जसवंतनगर)
रघुराज सिंह शाक्य (सप, इटावाह)
सुखदेवी वर्मा (सप, भर्ताना)
प्रमोद कुमार (सप, बिधूना)
प्रदीप कुमार (सप, दिबियापूर)
मदन सिंह उर्फ संतोष (सप, औरैया)
शिवकुमार बेरिया (सप, रसूलाबाद)
रामस्वरुप सिंह (सप, अकबरपूर-रानीया)
इंद्रपाल सिंह (बसप, सिकंदरा)
योगेंद्र पाल सिंह (सप, भोगनीपूर)
अरुणा कुमारी कोरी (सप, बिल्हौर)
मुनींद्र शुक्ला (सप, बिथूर)
सतीशकुमार निगम ‘अॅडव्होकेट’ (सप, कल्याणपूर)
सत्यदेव पचौरी (भाजप, गोविंदनगर)
हाजी इरफान सोलंकी (सप, शिशामाव)
सलिल बिश्नोई (भाजप, आर्यानगर)
अजय कपूर (काँग्रेस, किडवई नगर)
रघुनंदन सिंह बदौरिया (भाजप, कानपूर कैंट)
सतीश महाना (भाजप, महाराजपूर)
इंद्रजित कोरी (सप, गौतमपूर)
संतराम (बसप, माधवगड)
उमाकांती (काँग्रेस, कल्पी)
दयाशंकर (सप, ओराई)
कृष्णा पाल सिंह रजपूत (बसप, बबिता)
रवी शर्मा (भाजप, झांसी नगर)
डॉ. रश्मी आर्या (सप, मौरानीपूर)
दीपनारायण सिंह (दीपक यादव) (सप, गरौथा)
रमेश प्रसाद कुशवाह (बसप, ललितपूर)
फेरान लाल (बसप, मेहरोनी)
साध्वी निरंजन ज्योती (भाजप, हमीरपूर)
गयादीन अनुरागी (काँग्रेस, राठ)
रंजनारैन उर्फ राजू (बसप, महोबा)
उमा भारती (भाजप, चरखारी)
दलजीत सिंह (काँग्रेस, तिंदवारी)
विषंभर सिंह (सप, बबेरू)
गयाचरण दिनकर (बसप, नरैनी)
विवेककुमार सिंह (काँग्रेस, बंदा)
वीर सिंह (सप, चित्रकूट)
चंद्रभान सिंह पटेल (बसप, माणिकपूर)
मदन गोपाल वर्मा (सप, जहानाबाद)
सुखदेव प्रसाद वर्मा (बसप, बिंदकी)
सईद कासिम हसन (सप, फतेहपूर)
अयोध्या प्रसाद पाल (बसप, अयाह शाह)
मोहम्मद आसिफ (बसप, हुसैनगंज)
कृष्णा पासवान (भाजप, खगा)
प्रमोद कुमार (काँग्रेस, रामपूर खास)
विनोद कुमार (अपक्ष, बाबागंज)
रघुराज प्रताप सिंह (अपक्ष, कुंदा)
राजाराम (सप, विश्वनाथगंज)
नागेंद्र सिंह उर्फ मुन्ना यादव (सप, प्रतापगढ)
राम सिंह (सप, पट्टी)
प्रो. शिवकांत ओझा (सप, राणीगंज)
केशव प्रसाद (भाजप, सिराथु)
इंद्रजीत सरोज (बसप, मंझनपूर)
महंमद जाफरी (बसप, चैल)
अन्सार अहमद (सप, फाफामऊ)
सत्यवीर मुन्ना (सप, सोरांव)
सय्यद अहमद (सप, फुलपूर)
विजमा यादव (सप, प्रतापपूर)
महेश नारायण सिंह (सप, हंडिया)
गिरीश चंद्र उर्फ गामा पांडे (सप, मेजा)
दीपक पटेल (बसप, करछना)
पूजा पाल (बसप, अलाहाबाद पश्चिम)
अनुग्रह नारायण सिंग (काँग्रेस, अलाहाबाद उत्तर)
हाजी अहमद (सप, अलाहाबाद दक्षिण)
डॉ. अजय कुमार (सप, बारा)
राजबली जैसल (बसप, कोराँव)
फरीद किडवई (सप, कुर्सी)
धरम राज (सप, बाराबंकी)
राजीव कुमार सिंग (भाजप, दरियाबाद)
राम मगन (सप, हैदरगढ़)
आयूधेश प्रसाद (सप, मिल्कीपूर)
मित्रसेन यादव (सप, बिकापूर)
तेज नारायण पांडे (सप, अयोध्या)
अभय सिंह (सप, गोशैनगंज)
शंखलाल मांझी (सप, कटेहारी)
अझिमुल्हाक पहेलवान (सप, टेंडा)
भीम प्रसाद सोनकर (सप, अलापूर)
शेर बहादूर (सप, जलालपूर)
राममूर्ती वर्मा (सप, अकबरपूर)
सावित्रीबाई फुले (भाजप, बाल्हा)
माधुरी वर्मा (काँग्रेस, नानपरा)
यासर शाह (सप, मातेरा)
कृष्ण कुमार ओझा (बसप, महासी)
डॉ. वकार शहा (सप, बाहरैच)
मुकेश श्रीवास्तव (काँग्रेस, पयागपूर)
मुकुट बिहारी (भाजप, कैसरगंज)
इंद्रानी देवी (सप, भिंगा)
मुहम्मद रामजान (सप, सरस्वती)
अब्दुल मसहूद खान (सप, तुलसीपूर)
डॉ. शिवप्रताप यादव (सप, गैरसारी)
अरिफ अन्वर आसमी (सप, उत्राउला)
जगराम पासवान (सप, बलरामपूर)
नंदिता शुक्ला (सप, मेहनौन)
विनोद कुमार (सप, गोंदा)
बावन सिंग (भाजप, कत्रा बाजार)
योगेश प्रताप सिंग (सप, कर्नलगंज)
अवधेश कुमार सिंग (सप, तारबगंज)
बाबूलाल (सप, मंकापूर)
कुँवर आनंद सिंग (सप, गौरा)
लालमुन्नी सिंग (सप, शोहरतगढ)
विजय कुमार (सप, कपिलवास्तू)
जयप्रताप सिंग (भाजप, बन्सी)
माताप्रसाद पांडे (सप, इटावा)
कमल युसूफ मलिक (पीईसीपी, डुमरियागंज)
राजकिशोर सिंग (सप, हर्रिया)
रामप्रसाद चौधरी (बसप, कप्तानगंज)
संजय प्रताप जैयस्वाल (रुधौली, काँग्रेस)
जीतेंद्र कुमार (बसप, बस्तीसदर)
रामकरण आर्य (सप, महादेवा)
लक्ष्मीकांत (सप, म्हेदांवल)
डॉ. मोहम्मद आयुब (पीईसीपी, खलीलाबाद)
अलागु प्रसाद चौहान (सप, धनघाटा)
बजरंग बहादूर सिंग (भाजप, फरेंदा)
कौशल किशोर (काँग्रेस, नौटन्वा)
शिवेंद्र सिंग ऊर्फ शिवबाबू (सप, सिसवा)
सुदामा (सप, महाराजगंज)
देव नारायण सिंग (बसप, पनियारा)
फतेह बहादूर (राष्ट्रवादी काँग्रेस, कैम्पियारगंज)
राजमती (सप, पिपराईच)
डॉ. राधामोहनदास आगरवाल (भाजप, गोरखपूर अर्बन)
विजय बहादूर यादव (भाजप, गोरखपूर ग्रामीण)
राजेंद्र (बसप, सहाजन्वा)
संत प्रसाद (भाजप, खाजनी)
जय प्रकाश (बसप, चौरी-चौरा)
डॉ. विजय कुमार (बसप, बन्सगाव)
राजेश त्रिपाठी (बसप, चिल्लूपार)
विजय कुमार दुबे (खड्डा, काँग्रेस)
स्वामी प्रसाद मौर्य (भाजप, पदरौना)
अजय कुमार (काँग्रेस, तमकुही राज)
गंगा (भाजप, फाझिलनगर)
ब्रह्मशंकर त्रिपाठी (सप, खुशीनगर)
राधेश्याम (सप, हटा)
पूर्णमासी देहाती (सप, रामकोला)
अखिलेश प्रताप सिंग (काँग्रेस, रुद्रपूर)
जनमेजाय सिंग (भाजप, देवरिया)
शाकीर अली (सप, पाथरदेवा)
चौधरी फसिहा बशिर ऊर्फ गजालाल लारी (सप, रामपूर कारखाना)
कामेश्वर (सप, भातपर राणी)
मनबोध (सप, सालेमपूर)
प्रेम प्रकाश सिंग (सप, बरहाज)
डॉ. संग्राम यादव (सप, अत्रुलिया)
वसीम अहमद (सप, गोपाळपूर)
अभय नारायण (सप, सागरी)
शहा आलम ऊर्फ गुड्डू जमाली (बसप, मुबारकपूर)
दुर्गाप्रसाद यादव (सप, आझमगढ)
आलमबदी (सप, निजामाबाद)
श्याम बहादूर सिंग यादव (सप, फूलपूर पवई)
अदिल शेख (सप, दिदारगंज)
बेचाई (सप, लालगंज)
ब्रिजलाल सोनकर (सप, मेहनगर)
उमेश पांडे (बसप, मधुबन)
सुधाकर (सप, घोसी)
बैजनाथ (सप, मुहम्मदाबाद)
मुख्तार अन्सारी (क्यूईडी, माऊ)
गोरख पासवान (सप, बेलथारा रोड)
उमाशंकर (बसप, रासारा)
जाईउद्दीन रिज्वी (सप, सिकंदरपूर)
उपेंद्र तिवारी (भाजप, फेफाना)
नारद राय (सप, बलिया नगर)
राम गोविंद (सप, बन्सधी)
जयप्रकाश आंचल (सप, बैरिया)
ओमप्रकाश दुबे (बदलापूर)
शैलेंद्र यादव (सप, शहागंज)
नदीम जावेद (काँग्रेस, जौनपूर)
पारसनाथ यादव (सप, मलहानी)
सीमा (भाजप, मुर्गाबादशहापूर)
जगदीश सोनकर (सप, माचिलशहर)
श्रद्धा यादव (सप, मरियाहू)
सचिंद्रनाथ त्रिपाठी (सप, झाफराबाद)
गुलाबचंद (सप, केराकट)
सुब्बा राम (सप, जखानियन)
सुभाष (सप, सैदपूर)
विजय कुमार मिश्रा (सप, गाझिपूर)
कैलाश (सप, जांगिपूर)
सयेद शादाब फातिमा (सप, झहूराबाद)
सिबगत्तुला अन्सारी (क्यूईडी, मोहम्मदाबाद)
बब्बन (बसप, मुघलसराई)
सुशील सिंग (आयएनडी, सकालदिहा)
मनोज कुमार (आयएनडी, सईदराजा)
पूनम (सप, चाकिया)
अजय (पिंद्रा)
त्रिभूवन राम (बसप, अजागरा)
उदयलाल मौर्य (बसप, शिवपूर)
अनुप्रिया पटेल (अपना दल, रोहानिया)
रविंद्र जैस्वाल (भाजप, वाराणसी उत्तर)
श्यामदेव रॉय चौधरी (भाजप, वाराणसी दक्षिण)
ज्योत्स्ना श्रीवास्तव (भाजप, वाराणसी कँन्टोन्मेंट)
सुरेंद्र सिंग पटेल (सप, सेवापुरी)
जाहिद बेग (सप, भादोही)
विजय कुमार (सप, ग्यानपूर)
मधुबाला (सप, औराई)
भाई लाल कोल (सप, छानबे)
कैलाशनाथ चौरसिया (सप, मिर्झापूर)
रमेश चंद (बसप, माझावान)
जगतंबा सिंग (सप, चुनार)
ललितेश त्रिपाठी (मरिहान, काँग्रेस)
रमेश चंद्र (सप, घोरवाल)
अविनाश (सप, रॉर्बट्सगंज)
सुनील कुमार (बसप, ओब्रा)
रुबी प्रसाद (आयएनडी, दुद्धी)

एक्झिट पोल निकाल

सीएनएन आयबीएन :
सप+काँग्रेस (१२०)
भाजप (१८५)
बसप (९०)
इतर (९)

इंडिया टुडे :

सप+काँग्रेस (१२०)
भाजप (१८५)
बसप (९०)
इतर (९)

इंडिया न्यूजः
सप+काँग्रेस (१२०)
भाजप (१८५)
बसप (९०)
इतर (८)

टाईम्स नाऊ :

सप+काँग्रेस (११०-१३०)
भाजप (१९०-२१०)
बसप (५७-७४)

एबीपी न्यूज:

सप+काँग्रेस (१५६-१६९)
भाजप (१६४-१७६)
बसप (६०-७२), इतर (२-६)

व्हीएमआर :
सप+काँग्रेस (१२०)
भाजप (२००)
बसप (६४)