Alzheimer’s Symptoms & Precautions: नाकात बोटं घालू नये अशी एक साधी शिस्त सगळेच आईवडील आपल्या मुलांना लावण्याचा प्रयत्न करत असतात पण अनेकांना यात काही यश येत नाही. प्रत्यक सवयीप्रमाणे एकदा का नाकात बोटं घालण्याची सवय लागली कि ती सुटणं कठीण असतं, अगदी अनेक वयस्कर मंडळीही भररस्त्यात, चौकात कधी टेन्शनमध्ये कधी कंटाळा म्हणून तर कधी अस्वस्थ होऊन नाकात बोटं घालताना दिसतात, ही गोष्टी काहींच्या लक्षातही येत नाही पण असं करणं हे एका गंभीर आजाराची सुरुवात ठरू शकतं. ऑस्ट्रेलियन विद्यापीठातील संशोधकांच्या माहितीनुसार, नाकात बोट घातल्याने बॅक्टेरिया नाकातून आणि मेंदूमध्ये प्रवेश करू शकतात, ज्यामुळे अल्झायमरचा धोका बळावतो. जर्नल सायंटिफिक रिपोर्टमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

संशोधकांना काय आढळून आले?

ScienceAlert.com च्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठातील संशोधकांनी क्लॅमिडीया न्यूमोनियावर प्रयोग केले होते हा एक असा न्यूमोनियाचा जीवाणू आहे. चिंतेची बाब अशी की, यामध्ये उशीरा सुरू झालेल्या स्मृतिभ्रंशामुळे प्रभावित रुग्णांचे प्रमाण अधिक होते. शास्त्रज्ञांना असे आढळले की हे जिवाणू नाकाच्या पोकळी आणि मेंदूला जोडणाऱ्या मज्जातंतूमधून प्रवास करतात. यामुळे एपिथेलियमला ​​(नाकाच्या पोकळीच्या वरील बाजूला असणाऱ्या उतींचे नुकसान होते.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या

संशोधनात 24 ते 72 तासांच्या आत न्यूमोनियाच्या जिवाणूने ज्या गतीने सहभागी रुग्णांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये स्वतःची जागा तयार केली ते पाहून संशोधकही सज्ज होते. यानंतर मेंदूच्या पेशींनी अमायलोइड बीटा प्रोटीन जमा करण्यास सुरुवात केली ज्या अल्झायमर रोगाचे प्रमुख कारण आहेत.

नाकात बोट घालणाऱ्यांनी काळजी करण्याची गरज आहे का?

अद्याप तरी नाही, कारण ऑस्ट्रेलियात झालेले हे संशोधन उंदरांवर करण्यात आले होते. क्लेम जोन्स सेंटर फॉर न्यूरोबायोलॉजी अँड स्टेम सेल रिसर्चचे प्रमुख प्राध्यापक जेम्स सेंट जॉन यांनी हे संशोधन माणसांनाही लागू होण्याचे अंदाज वर्तवले होते. NDTV च्या माहितीनुसार, हे संशोधन माणसांसाठी सुद्धा तितकेच चिंताजनक आहे. त्यामुळे माणसांनीही नाकात बोट घालणे, नाकातील केस कापणे टाळणे हिताचे ठरेल.

विश्लेषण: कोट्यवधी रुग्ण पण उपचार ठाऊक नाही.. स्मृतीभ्रंश रोग नेमका कसा ओळखावा? जाणून घ्या लक्षणे

यापूर्वी अनेकदा अल्झायमरसंदर्भात संशोधन समोर आले आहेत. अल्झायमरच्या रुग्णांमध्ये रक्तप्रवाहात विशिष्ट विषारी घटक आढळून आले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, संशोधकांना असे दिसून आले की बीटा-अमायलोइड्स मेंदूच्या बाहेर तयार होतात आणि नंतर लिपोप्रोटीनद्वारे शरीराच्या रक्तप्रवाहातुन मेंदूत प्रवेश करतात.

अल्झायमरचा धोका नेमका कधी?

रक्तातून मेंदूपर्यंत जाणारे घटक नियंत्रित करणे हे महत्त्वपूर्ण आहे कारण जर आपण लिपोप्रोटीन-अॅमायलोइडच्या रक्तातील पातळी नियंत्रित करू शकलो आणि त्यांची मेंदूमध्ये होणारा प्रवाह रोखू शकलो, तर हे अल्झायमर रोग आणि स्मृतीभ्रंशापासून रोखण्यासाठी संभाव्य नवीन उपचार पद्धती ठरू शकते. SciTechDaily च्या माहितीनुसार, अल्झायमरची सुरुवात ही ६० व्या वर्षापासून होण्याची अधिक शक्यता असते. याच वयात अल्झायमर संबंधित तपासणी करणे हिताचे ठरू शकते.