सॉफ्टवेअर कोड लिहिण्यापासून ते चित्रपट, टीव्ही मालिकांच्या पटकथा लिहिण्यापर्यंत आणि साधा निंबध लिहिण्यासाठीदेखील जगभरातील काही लोक चॅटजीपीटीची क्षमता तपासायला लागले आहेत. चॅटजीपीटीला प्रश्न विचारून आपले ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काहींनी चॅटजीपीटीचा थोडा वेगळा वापर करण्यास सुरुवात केली. हे लोक चॅटजीपीटी सारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला स्वतःचा वैयक्तिक फिटनेस प्रशिक्षक बनवू पाहत आहेत. असे करणे कितपत योग्य आणि सुरक्षित आहे? याबद्दल जाणून घेऊ.

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे ग्रेग मुशेन यांनी बिझनेस इनसायडरला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फेब्रुवारी महिन्यापासून त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर सुरू केला. मुशेन म्हणाले, “चॅटजीपीटीमुळे मला धावण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि मी त्याच्या अधीन झालो. तसेच चॅटजीपीटीने क्रीडा मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्समध्ये डॉक्टरेट मिळवल्याप्रमाणे मला सल्ले दिले, असेही ते म्हणाले. मला कुतूहल होते. चॅटजीपीटी अशाप्रकारची मदत करू शकतो का? पण ही कल्पना काम करत आहे.”

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

मुशेन पुढे म्हणाले की, चॅटजीपीटीने त्यांना तिसऱ्या दिवशी धावू नये असा सल्ला दिला. तसेच त्यानंतरच्या दिवशी फक्त पाच मिनिटे धावण्यासाठी सांगितले. तसेच मला पुरेसा आराम करून मग पुन्हा धावण्यासाठी ऊर्जा कशी वापरावी याचे नियोजन चॅटजीपीटीने करून दिले. आता मी आठवड्यातून सहा वेळा धावायला जातो. त्यापैकी चार दिवस ४५ मिनिटे ते एक तासापर्यंत धावतो. तसेच एक दिवस किमान अर्धा तास घाटमाथ्यावरही धावायला जातो. पण ही धाव खूप थकवणारी असल्याकारणाने फक्त अर्धा तासातच हा कार्यक्रम आटोपता घेतो.

मॅशेबलच्या पत्रकार क्रिस्टिना सिल्वा यांनी तर चॅटजीपीटीकडून चार आठवड्याचा आहार आणि फिटनेस प्लॅन बनवून घेतला. “नक्कीच, मी तुमच्यासाठी चार आठवड्यांचा फिटनेस प्लॅन बनवून देऊ शकतो, ज्याच्याआधारे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता आणि तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहचलू शकता”, असे चॅटजीपीटीने दिलेले उत्तर वाचून सिल्वा अवाक झाल्या. तथापि, “एक गोष्ट ध्यान्यात घ्या की, प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगवेगळी आहे. त्यामुळे अनुवांशिकता, आहार आणि सातत्य यावर आधारीत निकाल वेगवेगळे असू शकतात”, असेही चॅटजीपीटीने सांगितले असल्याचे क्रिस्टिना सिल्वा म्हणाल्या.

त्यानंतर चॅटजीपीटीने क्रिस्टिनाला लगेचच दोन आठवड्यांचा प्लॅन दिला. तसेच एआयने तिला सल्ला दिला की, रोज २,००० ते २,२०० एवढ्या कॅलरीज आणि १६५ ग्रॅम प्रोटीन घ्यावे लागेल. ही सत्वे मिळवण्यासाठी काय खावे, असे विचारल्यानंतर चिकन, अंडी, बिफ आणि टर्की अशा पदार्थांचा सल्ला देण्यात आला. यासोबतच चॅटजीपीटीने क्रिस्टिएनाला सावधानतेचा इशारा देत असतानाच प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगवेगळी असून एखाद्या आहारतज्ज्ञ किंवा वैयक्तिक प्रशिक्षकाचा सल्लाही घ्यायला सांगितले.

चार आठवड्यांचा प्लॅन पूर्ण केल्यानंतर क्रिस्टिनाचे काही पाऊंड वजन कमी झाले आणि कंबर काही इंचानी कमी झाली. त्यामुळे चॅटजीपीटीचा फिटनेससाठी वापर करून मला अत्यंत आनंद झाला असल्याचे तिचे म्हणणे आहे. तसेच चॅटजीपीटीच्या काही सूचना सदोष असल्याचेही क्रिस्टिनाच्या लक्षात आले.

वैयक्तिक प्रशिक्षकाची नक्कल

टेक्सास मधील ३२ वर्षीय निकोलस गनिंग हा त्याचा मासिक व्यायामाचा प्लॅन आखण्यासाठी चॅटजीपीटीच्या सूचनांचे पालन करतो. वैयक्तिक प्रशिक्षक असलेला निकोलस सांगतो की, चॅटजीपीटी हे प्रशिक्षकाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. तुमच्या घरी इंटरनेट कनेक्शन किंवा स्मार्टफोन हवा आहे. डेनव्हर येथील ३१ वर्षीय सिद्धार्थ छटानी हा चॅटजीपीटीला वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून वापरतो. निकोलस आणि सिद्धार्थ दोघांच्याही मताप्रमाणे चॅटजीपीटी जेव्हा एकदम ठामपणे एखादी माहिती सांगतो, तेव्हा तो एखाद्या प्रशिक्षकाची नक्कल करतोय, असे वाटते.

चॅटजीपीटीमुळे मला व्यायामाचा तपशील मिळू शकला. कोणता व्यायाम कसा करावा, कोणत्या वेळी करावा आणि किती करावा? याची संपूर्ण माहिती चॅटजीपीटीवर मिळाली, जसे काही एक प्रशिक्षकच सर्व सांगतोय, अशी माहिती निकोलस याने विविष्ट स्नायूच्या व्यायामाबाबत विचारली असता एआयने त्याला दिली.

टिकटॉक कटेंट क्रिएटर जॉन यू याने टेक्नॉलॉजी रिव्हूव्ह डॉट कॉमला दिलेल्या माहितीनुसार, चॅटजीपीटीने त्याला सहा दिवसांसाठी पूर्ण शरीरीच्या व्यायामाचे नियोजन आखून दिले. जॉनने सांगितले की, यापैकी अनेक व्यायाम हे अतिशय सोपे होते. तसेच या मुलाखतीत जॉन असेही म्हणाला की, चॅटजीपीटीचा प्लॅन काटेकोरपणे अमलात आणण्यात मात्र त्याला कोणताही रस नाही.

ऑस्ट्रेलियामधील शरीरसौष्ठव स्पर्धेचा एक स्पर्धक आणि सोशल मीडिया कटेंट क्रिएटर ली लेम यांनी सांगितले की, चॅटजीपीटीला जेव्हा पायाचे व्यायाम सुचविण्यास सांगितले, तेव्हा त्याने ते बरोबर सुचविले. पण दोन व्यायामाच्या मधील विश्रांतीचा वेळ त्याने चुकीचा सांगितला. ली लेम पुढे म्हणाला की, बैठका मारण्याच्या दोन सेटदरम्यान केवळ ३० सेकंदाची विश्रांती घेणे हे अवास्तववादी आहे.

फिटनेससाठी चॅटजीपीटी वापरणे किती सुरक्षित?

या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, वैयक्तिक प्रशिक्षकाची जागा चॅटजीपीटी घेऊ शकत नाही. न्यूयॉर्कमधील मान्यताप्राप्त वैयक्तिक प्रशिक्षक जिल गुडट्री यांनी एनबीसीशी बोलताना सांगितले की, कमरेच्या वरील शरीराच्या स्नायूंना बळकटी करण्यासाठी व्यायाम सुचविण्यास सांगितल्यानंतर चॅटजीपीटीला सूचना देण्यात अपयश आले. महत्त्वाचे म्हणजे, एक माणूस जेवढा शरीराची काळजी घेऊन सूचना देऊ शकतो, तेवढे बॉटला जमणार नाही. वैयक्तिक प्रशिक्षण देणे ही खूप कौशल्याचे आणि महत्त्वाचे काम आहे.

चॅटजीपीटी हे अजिबात सुरक्षित नाही, यावर जोर देताना गुडट्री म्हणाले की, मोफत माहिती मिळणे, हे नेहमीच फायद्याचे ठरत नाही. विषय जेव्हा आरोग्य आणि प्रकृतीच्या स्वास्थ्याशी संबंधित असतो तेव्हा तर हा धोका पत्करू नये. तुमच्याकडे केवळ एकच शरीर आहे.

स्कॉट ब्रिटॉन यांनी मेन्स हेल्थ या वेबसाईटशी बोलताना सांगितले की, लोकांना वाटते की, मनुष्याकडे असलेली सर्व उत्तरे ‘एआय’कडे आहेत. पण जेव्हा प्रश्न आरोग्याचा असतो, तेव्हा तुम्हाला सक्रीय उत्तर मिळणे कठीण आहे. एआय तुम्हाला आणि तुमच्या शरीराला ओळखत नाही. तसेच तुमच्यासाठी त्याला उत्तरात बदलही करता येणार नाहीत. एआय सामान्यपणे सर्वांना जी माहिती देतो, तिच माहिती तुम्हालाही देणार आहे.

“चॅटजीपीटीने दिलेली माहिती चुकीची किंवा धोकादायक आहे, असे नाही. पण चॅटजीपीटीला तुमचे वय आणि तुमची परिस्थिती माहीत नाही. तुमच्या परिस्थितीनुसार सल्ला देणे त्याला जमणार नाही. तसेच तुम्ही काय करत आहात आणि कसे करत आहात, हे देखील त्याला कळणार नाही. त्याच जागी जर प्रशिक्षक असेल तर तो तुम्हाला तुमची शक्ती आणि परिस्थितीनुसार मार्गदर्शन करेल”, असेही स्कॉट ब्रिटॉन यांनी सांगितले.

वर उल्लेख केलेल्या क्रिस्टिना सिल्वाने मॅशेबलला दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितले होते की, जर तुम्ही व्यायामाला नुकतीच सुरुवात करणार असाल तर चॅटजीपीटी चांगली मदत करू शकते आणि शिवाय ते मोफतही आहे. पण जर तुम्हाला निश्चित ध्येय गाठायचे असेल किंवा विशिष्ट तयारी करायची असेल तर चॅटजीपीटी तेवढी मदत करू शकणार नाही. त्यामुळे चॅटजीपीटीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेतच. पण एआय तंत्रज्ञान वैयक्तिक प्रशिक्षक बनू शकत नाही, एवढे नक्की.