News Flash

FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषकात ‘रॉबी’चा स्वर

मॉस्कोमध्ये १४ जूनला होणाऱ्या रशिया आणि सौदी अरेबिया या संघांच्या सामन्यापूर्वीच्या शुभारंभ सोहळ्यात रॉबी त्याच्या गीतांचे सादरीकरण करणार आहे.

क्रीडाविश्वातील सर्वात भव्य अशा फिफा विश्वचषकाच्या शुभारंभ सोहळ्यात ब्रिटिश पॉप गायक रॉबी विल्यम्स त्याच्या गाण्यांवर सगळ्यांना थिरकवणार असल्याची घोषणा फिफा आणि रॉबीच्या प्रवक्त्यांनी केली आहे.

मॉस्कोमध्ये १४ जूनला होणाऱ्या रशिया आणि सौदी अरेबिया या संघांच्या सामन्यापूर्वीच्या शुभारंभ सोहळ्यात रॉबी त्याच्या गीतांचे सादरीकरण करणार आहे. ‘‘विश्वचषकाच्या मंचावरून सादरीकरण करायला मिळणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते आणि ते प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळणार असल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा  अविस्मरणीय क्षण आहे,’’ असे रॉबीने म्हटले आहे. दरम्यान, या सोहळ्यात ब्राझिलचा माजी आक्रमणपटू रोनाल्डोदेखील सादरीकरण करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 2:13 am

Web Title: fifa world cup 2018 british pop singer robbie williams
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : दिग्गज संघांमध्ये फ्रान्सचा संघ का मानला जातोय ‘डार्क हॉर्स’? जााणून घ्या…
2 अ‍ॅचिलस मांजरीच्या भविष्यवाणीकडे फुटबॉलजगताचे लक्ष
3 विश्वचषकातील अखेरचा डाव!