साहित्य : मुग डाळ २ वाट्या, गूळ दीड वाटी, वेलची दाणे १०-१२, कणिक दीड वाटी, तेल १ वाटी.

कृती : मुग डाळ थोडंसं पाणी घालून शिजवावी. मग चिरलेला गूळ घालून पुरण करून घ्यावं. वेलची पावडर आणि थोडं मीठ घालून ढवळून, पुरण गार करून घ्या. कणकेत ३ चमचे तेल तापवून घाला. बटाटा वड्याच्या पिठासारखं पातळ पीठ करून घ्या. पुरण मळून, त्याचे लिंबा एवढे गोळे करून घ्या. कढई मधे तेल तापवून घ्या. पुरणाचे गोळे कणकेत बुडवून तेलात लालसर तळून घ्या. शकून उंडे हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे. गरम गरम शकून उंडे साजूक तुपाबरोबर अतिशय चविष्ट लागतात. ह्या गणेश उत्सवात नक्की करून बघा.