आयुर्वेदाची चिकित्सा असे सांगते की, थंडीमुळे शरीरातील वायू वाढतो. त्याला स्निग्धता कमी पडल्याने तो त्वचेला भेगा पाडतो. त्यामुळेच ओठ आणि पायांना भेगा पडतात.

उपाय काय?
ओठाला किंवा पायाच्या भेगांना एरंडीचे तेल (एरंडेल) किंवा साजूक तूप लावावे. लहान मुलांना दुधावरची सायसुद्धा लावता येते. (एरंडेल खाण्यासाठी वापरले जाणारेच घ्यावे. ते औषधांच्या दुकानात मिळते.)

what is heatwave in marathi
विश्लेषण: वाढत्या तापमानाचा तडाखा किती तीव्र? उष्माघात प्राणघातक कसा ठरतो?
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा

यामुळे काय होते?
असे केल्याने शरीराला बाहेरून स्निग्धता मिळते. त्याचा चांगला परिणाम होतो.

इतर काय काळजी घ्यावी?
* पनीर, मांसाहार यासारखे जड पदार्थ, डाळीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. विशेषत: रात्रीच्या वेळी टाळावेत.
* आहारात साजूक तूप, दुधाचा समावेश असावा.
* स्ट्रेचिंगचे व्यायाम आणि शरीरात ऊब निर्माण होईल असे व्यायाम करावेत.