IPL 2020 : पदार्पणाच्या सामन्याआधी यशस्वी जैस्वालने घेतले धोनीचे आशिर्वाद, पाहा व्हिडीओ

मोठी खेळी करण्यात जैस्वाल अपयशी

युएईत शारजाच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईच्या गोलंदाजांची पिसं काढली. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने २१६ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकर यशस्वी जैस्वालने आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. नाणेफेक झाल्यानंतर जैस्वालने चेन्नईचा कर्णधार धोनीची भेट घेऊन हात जोडत त्याचे आशिर्वाद घेतले.

धोनीनेही यशस्वीसोबत हात मिळवत त्याला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

सलामीचा सामना खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालकडून अनेकांना खूप अपेक्षा होत्या. परंतू पहिल्याच सामन्यात केवळ ६ धावा काढून तो माघारी परतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2020 yashasvi jaiswal seeks ms dhonis blessings before debut psd

ताज्या बातम्या