क्रिकेटचं मैदान म्हटलं की दुखापती या आल्याच. अनेकदा फलंदाजी करत असताना बॉल नाजूक जागेवर लागल्यामुळे अनेक फलंदाजांच्या डोळ्यासमोर तारे चमकतात. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यात सलामीवीर फिंचसोबत असाच एक प्रकार घडला. जेम्स पॅटिन्सन टाकत असलेल्या दुसऱ्या षटकात टप्पा पडून आत आलेला चेंडू फिंचच्या नाजूक जागेवर लागला आणि तो थेट मैदानातच झोपला. बॉलचा स्पीड इतका होता की फिंचला होणाऱ्या वेदना या स्पष्ट दिसत होत्या. पाहा हा व्हिडीओ…

यानंतर फिंचने स्वतःला सावरत बहारदार खेळी केली. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत फिंचने ३५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी केली. फिंचने पडीकलसोबत ८१ धावांची भागीदारी करत RCB ला भक्कम सुरुवात करुन दिली. अखेरीस ट्रेंट बोल्टने फिंचला बाद करत मुंबईला पहिलं यश मिळवून दिलं.