News Flash

IPL 2020 : पंजाबचा ‘पॉवरप्ले’, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई

मयांक-राहुल जोडीची मैदानात चौफेर फटकेबाजी

फोटो सौजन्य - Deepak Malik / Sportzpics for BCCI

आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांनी आपला धडाकेबाज खेळ सुरुच ठेवला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर हार न मानता पंजाबने दमदार पुनरागमन केलं. दुसऱ्या सामन्यात कर्णधार लोकेश राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात केली. यानंतर शारजाच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल या जोडीने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे.

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची धुलाई करत लोकेश-मयांक जोडीने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये ६० धावा वसूल केल्या. आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत कोणत्याही संघाने पॉवरप्लेमध्ये केलेल्या या सर्वोच्च धावा ठरल्या आहेत.

Next Stories
1 IPL 2020: ‘मुंबई इंडियन्स’कडून हार्दिक पांड्याबद्दल महत्वाची माहिती
2 IPL 2020: राजस्थानचा ‘रॉयल’ कारभार! पंजाबवर रोमहर्षक विजय
3 IPL 2020 : क्रिकेटसाठी वयाच्या दहाव्या वर्षी सोडलं घर, वाचा कसा घडला यशस्वी जैस्वाल??
Just Now!
X