मुंबई आणि बंगळुरु यांच्यात दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये अखेरीस बंगळुरुने बाजी मारली. मुंबईने विजयासाठी दिलेलं ८ धावांचं आव्हान आरसीबीने सहज पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने लेग साईडला चौकार मारला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डगआऊटमधील खेळाडूंनी एकच जल्लोष केला. मात्र या जल्लोषामध्ये एक महिलाही रॉयल चॅलेंजर्सची जर्सी घाऊन जल्लोष करताना दिसली. मात्र ही महिला कोण आहे यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर नंतर चर्चा सुरु झाल्याचे पहायला मिळालं. या महिलेचे नाव नविना गौतम असून ती आरसीबीच्या सपोर्टींग स्टाफपैकी एक आहे. नविना ही मसाज थेरिपिस्ट आहे.

नविनाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही कोणत्याही आयपीएल संघसाठी काम करणारी पहिलीच महिला सपोर्टींग स्टाफ असल्याचे म्हटले आहे. नविनाचे हे आरसीबीबरोबरचे पहिलेच वर्ष असून मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आरसीबीने तिच्यासोबत करार केला आहे. या संदर्भातील वृत्त समोर आल्यानंतर नविनाच्या नावाची प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. आयपीएलमध्ये या पूर्वी कधीही महिला सपोर्टींग स्टाफला संधी देण्यात आलेली नसल्याने नविनासोबत आरसीबीने केलेल्या करारानंतर ती अचानक प्रकाशझोतात आली.

आरबीसीसोबत करार करण्याआधीही दोन महिलांची सपोर्टींग स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांना नंतर संधी देण्यात आली नाही. डेक्कन चार्जर्सने अ‍ॅश्ली जॉइस आणि पेट्रीका जेकीन्स या दोघींना मसाज थेरिपिस्ट म्हणून नियुक्त केलं होतं. नविनासाठी हा आयपीएलचा पहिलाच हंगाम असला तरी तिने यापूर्वी क्रिकेटपटू आणि इतर खेळाडूंबरोबर काम केलेलं आहे. मूळची कॅनडाची असणाऱ्या नविनाने यापूर्वी ग्लोबल टी-२० कॅनडा लीगमधील टोरांटो नॅशनल्स या संघासाठी काम केलं आहे. त्याशिवाय बास्केटबॉल आशिया कपमध्ये तिने भारतीय महिला संघासोबत काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

#navnitagautam #playbold #rcb

A post shared by navnita gautam (@navnita_gautam) on

नविना सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टीव्ह नसली तरी तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. यावर दोन हजारहून अधिक जण तिला फॉलो करतात.