27 October 2020

News Flash

MI vs CSK : धोनी कधी येणार?? सोशल मीडियावर रंगली चर्चा

रायुडू- डु प्लेसिसचं अर्धशतक, चर्चा मात्र धोनीचीच

फोटो सौजन्य - Pankaj Nangia / Sportzpics for BCCI

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्जने दणक्यात विजय साजरा करत केली. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर चेन्नईने ५ गडी राखून मात केली. मुंबईने विजयासाठी दिलेलं १६३ धावांचं आव्हान चेन्नईने अंबाती रायुडू आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. अंबाती रायुडूने ७१ तर डु-प्लेसिसने नाबाद ५८ धावा केल्या. रायुडू आणि डु-प्लेसिस जोडीने शतकी भागीदारी करत चेन्नईच्या विजयाची पायाभरणी केली.

राहुल चहरने अंबाती रायुडूला बाद करत चेन्नईची जोडी फोडली. रायुडू माघारी परतल्यानंतर धोनी मैदानात येईल अशी अनेकांना अपेक्षा होती. परंतू धोनीने आपल्याआधी रविंद्र जाडेजा आणि सॅम करन यांना संधी देत स्वतः मागे थांबणं पसंत केलं. अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांनीही सोशल मीडियावर धोनी फलंदाजीला कधी येणार?? तसेच धोनी का येत नाहीये?? असे प्रश्न विचारायला सुरुवात केली होती.

अखेरीस सॅम करन माघारी परतल्यानंतर धोनी मैदानात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे शून्यावर असताना धोनी झेलबाद असल्याचं मुंबईचं अपील पंचांनी उचलून धरलं. परंतू तिसऱ्या पंचांच्या पाहणीत धोनी नाबाद असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याला जीवदान दिलं. यानंतर धोनी विजयी फटका खेळून संघाला विजय मिळवून देईल अशी अनेक चाहत्यांची अपेक्षा होती. परंतू धोनीने एकही धाव न काढता डु-प्लेसिसला विजयी फटका खेळण्याची संधी दिली. धोनी ० धावांवर नाबाद राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 11:41 pm

Web Title: ipl 2020 mi vs csk fans keep guessing when ms dhoni will come to bat on social media psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 Ipl 2020 : फिरकीपटूंची जुगलबंदी!
2 VIDEO: दे दणादण! पांड्याने दोन चेंडूत लगावले दोन षटकार
3 Video : डु-प्लेसिस फ्लाईंग मोडमध्ये, सीमारेषेवर पकडले दोन भन्नाट कॅच
Just Now!
X