नवी दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यार्थिनी, शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली असून तसे परिपत्रकही विद्यापीठांना धाडण्यात आले आहे. त्याप्रमाणे याबाबतचे धोरण आखण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला असून अशा प्रकरणांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल (ऑम्बुड्समन) नेमण्याचाही विचार असल्याची माहिती यूजीसीचे अध्यक्ष प्रा. वेदप्रकाश यांनी दिली.
स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या ‘युवा दिन’ सोहळ्याप्रसंगी केलेल्या भाषणात वेदप्रकाश यांनी ही माहिती दिली. या सोहळ्याचे उद्घाटन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते झाले. दिवसभर चाललेल्या विविध सत्रांमध्ये दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिनेश सिंग, ‘एनडीटीव्ही’च्या समूह संपादक बरखा दत्त, चित्रपट दिग्दर्शक राजू हिराणी, सह्याद्री वाहिनीचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, ‘आयबीएन लोकमत’चे संपादक निखील वागळे, खासदार संजय राऊत, आमदार देवेंद्र फडणवीस, जितेंद्र आव्हाड, नितीन सरदेसाई, मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह आदी मान्यवरांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. या वेळी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये १०० महाविद्यालयांतील सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत आखण्यात आलेल्या नव्या धोरणाबाबत माहिती देताना वेदप्रकाश म्हणाले की, विद्याíथनींवर कोणतेही अत्याचार होऊ नयेत यासाठी स्थानिक पातळीवर विविध समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. या समित्या विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतील. त्यांनी पाठविलेल्या अहवालावर प्रा. मीनाक्षी गोपीनाथ यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गट चर्चा करेल व विविध शिफारशी करेल. शिवाय निवृत्त न्यायमूर्तीची लोकपाल म्हणून प्रत्येक विद्यापीठात नियुक्ती करण्याचाही विचार आहे. विद्याíथनी, महिला कर्मचारी, शिक्षिका यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत या लोकपालाकडे तक्रार करता येईल. युवकांच्या मानसिकेतमध्ये बदल करण्याच्या दृष्टीनेही िलग समानतेविषयीचा अभ्यास अभियांत्रिकी, एमबीए, कला अशा सगळ्याच पाठय़क्रमात समाविष्ठ करण्याच्या सूचना विद्यापीठांना केल्याचेही वेदप्रकाश म्हणाले.