अध्यापन क्षेत्रात कारकीर्द करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगळ्यावेगळ्या अभ्यासक्रमाची ओळख करून देत आहोत. त्याचबरोबर लेखन क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ संबंधित विविध अभ्यासक्रमांची माहिती देत आहोत..
शिक्षण क्षेत्रातील पदार्पणासाठी..
नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग या संस्थेमार्फत बीएस्सी, बीएड हा शिक्षक प्रशिक्षणाचा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या संस्थेत महाराष्ट्र, गोवा,मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या संस्थेमार्फत चालविण्यात येणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
  बॅचलर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड बॅचलर ऑफ एज्युकेशन :
कालावधी चार वर्षे. अर्हता : बारावी विज्ञान शाखेमध्ये खुल्या संवर्गातील उमेदवारांना ५० टक्के गुण आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील उम्मेदवारांना ४५ टक्के गुण आवश्यक. ज्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र गटात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा अभ्यास केलेला असावा. ज्या विद्यार्थ्यांना जैविकशास्त्र गटात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा.
  बॅचलर ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड बॅचलर ऑफ एज्युकेशन :
कालावधी- चार वर्षे. अर्हता : कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. बारावी परीक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण आवश्यक. (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण)
  बी.एड : कालावधी दोन वर्षे. अर्हता – बीए किंवा बीएस्सी
विषयातील पदवीधर. पदवी परीक्षेत ५० टक्के गुण आवश्यक. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये पाच टक्के सवलत. बीएस्सी ही पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांने भौतिकशास्त्र, रसायशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि गणित यापकी कोणत्याही दोन विषयांचा अभ्यास केलेला असावा. बीए पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी िहदी, गुजराथी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू यापकी कोणत्या एका भाषेतील साहित्याचा अभ्यास केलेला असावा. इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र यापकी कोणताही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा. एम.एड : कालावधी एक वर्ष. विज्ञान, मानव्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवीधराला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. मात्र या विद्यार्थ्यांला या परीक्षेत ५५ टक्के गुण मिळायला हवेत. या शिवाय या विद्यार्थ्यांने ५० टक्के गुणांसह बीएड ही पदवी प्राप्त केलेली असावी.
अर्ज कसा कराल?
वेबसाइटवरून अर्ज काळजीपूर्वक भरावा. या अर्जासोबत सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती आणि २०० रु. (एसटी, एसस्सी.साठी १०० रु.)चा रेखांकित डिमांडडठाफ्ट जोडावा. हा डठाफ्ट प्रिन्सिपल, रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, भोपाळ या नावे काढलेला असावा. संस्थेला २० जून २०१३ पर्यंत अर्ज मिळणे आवश्यक आहे.शिष्यवृत्ती : बीएड्. अभ्यासक्रमावर संपूर्ण लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या खुल्या गटातील २० टक्के विद्यार्थ्यांना व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण(एनसीईआरटी)च्या नियमानुसार शिष्यवृत्ती देण्यात येते.
निवडप्रक्रिया : विद्यार्थ्यांची निवड मुलाखतीद्वारे केली जाते. बारावी/ पदवी/ पदव्युत्तर पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादीनुसार विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. प्रत्येक राज्यासाठी जागा राखीव आहेत.
पत्ता : प्रिन्सिपल, रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, श्यामला हिल, भोपाळ-४६२०१३, दूरध्वनी- ०७५५२५२२०१२.
वेबसाइट- http://www.riebhopal.org
  डॉ. हरिसिंघ गौर विश्वविद्यालयाचे एकात्मिक अभ्यासक्रम : सेंट्रल युनिव्हर्सटिीचा दर्जा असलेल्या या विद्यापीठामार्फत चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये बारावीनंतरच्या एकात्मिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड बॅचरल ऑफ एज्युकेशन (बीएस्सी -बीएड) आणि बॅचलर ऑफ आर्ट अ‍ॅण्ड बॅचरल ऑफ एज्युकेशन (बीए – बीएड) हे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. कालावधी- चार वष्रे. अर्हता- बारावीमध्ये ५० टक्के गुण आवश्यक. अनुसूचित जातीजमातीच्या उमेदवारांना ४५ टक्के गुण आवश्यक. प्रवेशपरीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी महाराष्ट्रात पुणे आणि नागपूर ही केंद्रे आहेत. अर्ज ऑनलाइन भरता येतो. अर्ज व माहितीपत्रक http://www.dhsgsu.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पत्ता- द चेअरमन, अ‍ॅडमिशन सेल,
डॉ. हरिसिंघ गौर विश्वविद्यालय, सागर – ४७०००३, मध्य प्रदेश. दूरध्वनी-०७५८२-२६५८३३. ईमेल- dmissiondhsgsu@gmail.com
लेखनकौशल्य अवगत होण्यासाठी.. लिखाणाचे तंत्रकौशल्य शिकवणाऱ्या काही संस्था-
  द रॉयटर्स ब्युरो :
इंग्लडमधील मँचेस्टर येथील या संस्थेत या संस्थेमार्फत लेखन कसे करावे हे शिकवणारे साहित्य घरपोच पाठवले जाते. अर्ज करण्यासाठीचा पत्ता : द रायटर्स ब्युरो, ८-१०, डट्टान स्ट्रीट, मँचेस्टर, एम थ्री, वन एलई इंग्लंड, फॅक्स : (+४४) १६१ ८१९२८४२, दूरध्वनी- १६१८१९९९२२ मेल : studentservice@writersbureau.com वेबसाईट :
http://www.writersbureau.com
  सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग :
संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
* डिप्लोमा इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश. अर्हता- बारावीपर्यंतचे इंग्रजी माध्यमातील शिक्षणे. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्रिएटिव्ह रायटिंग इन टेक्निकल
रायटिंग. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. पत्ता- सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लìनग, सिम्बॉयसिस भवन, १०६५ बी, गोखले क्रॉस रोड मॉडेल कॉलनी, पुणे-४११०१६. दूरध्वनी-०२०-६६२११०००, वेबसाइट- http://www.scdl.net
 नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अ‍ॅण्ड इन्फम्रेशन रिसोस्रेस :
संस्थेने सायंटिफ पेपर रायटिंग हा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. ही संस्था काउन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्क्यांसह पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई किंवा एमबीबीएस किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स आणि ही पदवी घेतल्यानंतर एक वर्षांचा अनुभव. पत्ता- हेड, ईटीटीजी, एनआयएससीएआयआर, १४, सत्संग विहार मार्ग, न्यू दिल्ली – ११००६७. दूरध्वनी-०११-२६५६०१४१. वेबसाइट- http://www.niscair.res.in
 स्कूल ऑफ ह्य़ुमॅनटिज-इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी :
डिप्लोमा इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश. अर्हता- बारावी उत्तीर्ण. कालावधी- किमान एक वर्ष आणि कमाल चार वर्षे. शुल्क – २५०० रुपये. पत्ता- स्कूल ऑफ ह्य़ूमॅनिटिक्स, टागोर भवन, ब्लॉक एफ, मदान घारी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटि नवी दिल्ली- ११००६८, संपर्क: ई-मेलsoh@ ignou.ac.in, दूरध्वनी-०११-२९५३६४४१.