कोल्हापूर : सत्ताधारी मंडळींवर टीका करत असल्याने विरोधकांना ते आवडते आहे. पण, उद्या तुमची सत्ता आली तरी शेतकरी हितासाठी संघर्ष अटळ असणार आहे, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी विरोधकांना सुनावले. उभय काँग्रेसशी मैत्र जुळलेल्या शेट्टी यांनी राजकीय मैत्री करतानाची आपली पूर्वअटही या वेळी स्पष्टपणे सांगितली.

सतेज कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शेट्टी बोलत होते. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशीही शिवसेना, स्वाभिमानी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सरकार ऊ सदर प्रश्नी लक्ष घालत नसल्याने टीका केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न मुळापर्यंत सुटत नाही तोपर्यन्त आमची संघर्षांचीच भूमिका राहील असे शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरचा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याची पहिली नजर शिवारात, दुसरी नजर बाजारात आणि तिसरी नजर राजकारणात असली पाहिजे,असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

शिवसेनेचे सहसंपर्क  प्रमुख प्रा. संजय मंडलीक यांनी आगामी काळात सतेज पाटील यांनी श्रीकृष्णाची भूमिका घेऊ न आम्हाला साथ द्यावी,असे आवाहन करत लोकसभा निवडणुकीच्या पडद्याआड मदत करावी अशी अपेक्षा केली.

या वेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आंबिटकर, माजी आमदार संपतराव पवार यांची भाषणे झाली.