कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले तरी तलावाचे विद्रुपीकरण सुरूच राहिले आहे. प्रदूषणामुळे मासे मृत, अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग असे प्रकार वाढीस लागले असल्याने कोल्हापूर महापालिकेवर टीकेची झोड उठत आहे.

रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम शासन निधीतून हाती घेतले आहे. हे काम रखडले असल्याचे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या पाहणीवेळी दिसून आले होते. मात्र अजूनही रंकाळ्याचे विद्रुपीकरण सुरूच आहे. पाणी प्रदूषित झाल्याने मासे मृत झाले आहेत. पाण्याला काळपट तेलकट तवंग येत असल्याने रंकाळ्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते असे रविवारी तलावाची पाहणी केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. रंकाळ्याची अशी दुरवस्था होत असताना महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा – कर्ता पुरुषच गेला,आता आम्हाला आधार कुणाचा? लोकरेंच्या पत्नी, मातेच्या आक्रोशाने समरजितसिंह घाटगेंसह नातेवाईक गलबलले

हेही वाचा – कोल्हापुरात आंबेच आंबे; महोत्सवाला ४७ जातीचे आंबे सादर

महापालिका गांभीर्याने लक्ष देत नाही तोपर्यंत रंकाळ्याचे कितीही सुशोभीकरण केले तरी मूळ दुखणे कायम राहणार आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून सुधारणा केली जाणार असल्याचे समाजमन संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे यांनी सांगितले.