मावळत्या सूर्याच्या साक्षीने करवीरनगरीचा पारंपरिक शाही दसरा सोहळा मोठय़ा उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा झाला. ऐतिहासिक दसरा चौक येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करून सीमोल्लंघन करण्यात आले. शमीपूजन झाल्यानंतर हजारो नागरिकांनी ऐतिहासिक दसरा चौकात सोने लुटण्याच्या सोहळ्याचा आनंद लुटला. प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही या सोहळ्याला उपस्थिती लावली.

देशातील प्रमुख सोहळ्यांपकी एक आणि म्हैसूरपाठोपाठ असलेला शाही दसरा म्हणून याची ओळख आहे.  संस्थानकालीन परंपरा असलेल्या शाही दसरा सोहळ्याच्या सीमोल्लंघनासाठी दुपारपासूनच शहरात लगबग सुरू होती. सूर्यास्ताच्या वेळी सोने लुटण्याचा कार्यक्रम येथील दसरा चौकात परंपरेप्रमाणे आयोजित केला होता. यासाठी निमंत्रितांसह मानकरी व नागरिकांना बसण्यासाठी अलिशान शामियाना उभारण्यात आला होता. साडेपाच वाजता श्री महालक्ष्मी, श्री भवानी आणि श्री गुरुमहाराज यांच्या पालख्या लवाजम्यासह दसरा चौकात आल्या. सायंकाळी  ६ वाजता मेबॅक मोटारीतून न्यू पॅलेसवरून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार युवराज संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे व यशराजे शाही लवाजम्यासह बाहेर पडले. दसरा चौकात त्यांचे पोलीस बँड पथक आणि आर्मी बँड पथकाने स्वागत करण्यात आले.

येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर
vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Congress Sangli, Sangli Lok Sabha,
सांगलीत काँग्रेसचा लागोपाठ दुसऱ्यांदा विचका, वसंतदादांच्या घराण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली

रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या असंख्य नागरिकांनी पालख्यांवर सोन्याची म्हणजेच आपटय़ांच्या पानांची श्रद्धेने उधळण केली. बलगाडय़ा, घोडे, तोफ, भालदार, चोपदार, बा-आदबची ललकारी यामुळे वातावरणाला ऐतिहासिक कोंदण लाभले होते. श्रीमंत शाहूमहाराजांनी शमीपूजन केले.  शमीपूजन झाल्यानंतर देवीची आरती झाली आणि छत्रपतींनी सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांच्या मुहूर्तावर शमीचं पान हळूवारपणे खुडताच, हवेत बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या, नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. हा उपस्थित जनतेला सीमोल्लंघनाचा संदेश होता.  सीमोल्लंघनाच्या या शाही सोहळ्यानंतर करवीरच्या जनतेनं राजघराण्यातील व्यक्तींना अभिवादन करत सोने देण्यासाठी गर्दी केली होती. प्रत्येकजन परस्परांना शुभेच्छा देऊन, दसऱ्याचा आनंद अनुभवत होता. सोहळ्याला माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमित सनी,  जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे यांसह आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आदींसह नागरिक उपस्थित होते.