कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत अति वेगात गाडी चालवून कोष्टी समाजातील पुणे येथे नोकरी करणाऱ्या युवतीसह दोघांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन धनधांडग्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, आरोपीच्या मालमत्तेतील २५ टक्के स्थावर मालमत्ता मयताच्या वारसांना द्यावी, अशी मागणी समस्त कोष्टी समाज संघटनेच्यावतीने पुणे पोलिस आयुक्ता अमितेशकुमार यांचाकडे केली आहे.

अधिक माहिती की, रविवार दिनांक १९ मे २०२४ च्या मध्यरात्री कल्याणीनगर पुणे परिसरात एक भीषण अपघात धनधानग्या परिवारातील, मध्याधुंद अल्पवयीन मुलाच्या हातून झाला. यामध्ये कोष्टी समाजातील पुणे येथे नौकरी करणारी युवती आश्विनी कोष्टा व अनिष अवधिया या युवकाचा मोटार सायकलवर जात असताना जागीच ठार झाले, अपघाताने दोघांचे बळी घेतले. या घटनेचा समस्त कोष्टी समाजाच्यावतीने तीव्र निषेध करत मागण्यांचे लेखी निवेदन पुणे पोलिस आयुक्त आमितेशकमार यांच्या मार्फत शासनाला दिले.

आणखी वाचा-खबरदार आवाजाची भिंत, फ्लेक्स, फटाके वाजवाल तर; मंगवस्त ५ हजाराचा दंड,पाणी जोडणी बंद होणार 

निवेदनात नमुद केले की, कोष्टी समाजातील जबलपुर येथील पुणे येथे नोकरी करणारी युवती अश्विनी कोष्टा व अनिष अवधियाचा एका धनधानग्या कुटुंबातील अल्पवयीन युवकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून हकनाक बळी घेतला. अत्यंत दुःखद ही घटना घडल्याने कोष्टी, कोष्टा समाजात दुःखाची लहर पसरली. समाज आक्रोशीत झाला, अश्विनीला न्याय मिळावा अशी मागणी होऊ लागली.

यावेळी अल्पवयीन मुलाच्या नावची २५ टक्के मालमत्ता मयताच्या वारसांच्या नावे करावी, अपघातग्रस्त युवकांवर कठोर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी केली. हा आक्रोश पुणे पोलीस आयुक्त व मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अखिल भारतीय कोष्टी कोष्टा फेडरेशन व विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, देवांग कोष्टी समाज पुणे,अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषद व महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ अरुण वरोडे, राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलिस आयुक्त यांना समक्ष भेटून निवेदन देवून आक्रोश व्यक्त करण्यासाठी आज भेटले, सुमारे ३० मिनीट चर्चा झाली. सक्त कारवाई करण्यात येईल याची ग्वाही देखील पोलीस आयुक्त यांनी शिष्टमंडळाला दिली.

आणखी वाचा-VIDEO : धक्कादायक ! कोल्हापुरातील होमगार्डना मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक; शिवीगाळ केल्याचा आरोप

याप्रसंगी विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे बालाजी चिनके, सुनील ढगे, दत्ता ढगे, मंजुषा फासे, स्वाती डहाके, अशोक भूते, भगवान गोडसे, सुनिल डहाके, सतिश लिपारे, राजेंद्र खटावकर, राजेंद्र चोथे, आश्विन चोथे, पुंडलिक पोहेकर, अमोल तावरे,प्रणव तावरे, उल्हास कुमठेकर, शांताराम डोईफोडे, सोमनाथ टिकोळे, अलोक टिकोळे इत्यादी कोष्टी कोष्टा समाज बांधव उपस्थित होते.