भारताच्या पराभवासाठी मी क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरणार नाही. गोलंदाजांनी अधिक धावा दिल्यामुळे सामना हातातून निसटला. प्रारंभीच्या षटकांमध्ये आमची गोलंदाजी चांगली झाली नाही. पण युवराज सिंग याच्यासहित फिरकी गोलंदाजांनी मग सामना आवाक्यात आणला, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. सर्वात शेवटी आणखी १०-१२ धावा आमच्याकडे असत्या तर बरे झाले असते असे वाटले. पण वेगवान गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव मिळाला. त्यांच्या भविष्यासाठी तो उपयुक्त ठरेल, असे धोनीने पुढे सांगितले.
तथापि, अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेणारा इंग्लिश फलंदाज ईऑन मॉर्गन पत्रकार परिषदेला अत्यंत खूषीत होता. तो म्हणाला, शेवटचे तीन चेंडू बाकी असताना आमचे दडपण वाढले. पण आम्ही आत्मविश्वासाने सामना करीत सामना जिंकण्याची किमया साधली.