पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुक याला पुन्हा एकदा अश्विनने त्रिफळाचित केले. तत्पूर्वी, भारताचा डाव सर्वबाद २७४ धावात आटोपला. एका वेळी बलाढ्य वाटणाऱ्या २८७ धावांचा पाठलाग करताना विराटने अप्रतिम १४९ धावांची खेळी केली. ‘साहेबां’च्या भूमीवर त्याने पहिले आणि कारकिर्दीतील २२वे शतक ठोकले. इंग्लंडतर्फे कुर्रानने ४ तर रशीद, स्टोक्स आणि अँडरसनने २-२ गडी बाद केले.

या सामन्यात बेन स्टोक्स या इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने एक विक्रम केला. बेन स्टोक्स याने भारताच्या पहिल्या डावात दिनेश कार्तिकला बाद करत आपला १००वा बळी साजरा केला. त्या बरोबरच कसोटीतील २५०० धावा आणि १०० बळी घेणारा तो इंग्लंडचा तिसरा अष्टपैलू खेळाडू ठरला. कमी कालावधीत हि किमया साधणाराही तो तिसरा खेळाडू ठरला. त्याने ४३ कसोटीमध्ये ही कामगिरी केली. याआधी इयन बोथम यांनी कसोटीत ५२०० धावा आणि ३८३ बळी घेतले आहेत. तर स्टुअर्ट ब्रॉड याने २९७७ धावा आणि ४१७ बळी घेतले आहेत. त्यानंतर स्टोक्सने ही कामगिरी केली.

यासह कमी वेळेत हि किमया करणारादेखील स्टोक्स तिसरा ठरला. या यादीत पहिल्या स्थानी बांगलादेशचा शाकिब अल हसन आहे. त्याने ३७ कसोटीत ही कामगिरी केली होती. तर टोनी ग्रेग आणि गोड्डार्ड यांनी ४० व्या कसोटीत ही कामगिरी केली होती.