News Flash

Video: के. एल. राहुलचे क्षेत्ररक्षण पाहून सर्वचजण झाले अवाक; तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ?

राहुलने षटकार अडवला आणि फलंदाजांना केवळ दोनच धावा काढता आल्या

फोटो सौजन्य : ट्विटरवरुन साभार

धावसंख्या कमी असली की गोलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामना फिरवण्याची ताकद संघाकडे हवी असं म्हटलं जातं. भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यानच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्येही असाच एक भन्नाट प्रयत्न भारतीय खेळाडूकडून पहायला मिळाला. भारतीय संघाची डळमळती सुरुवात झाल्यानंतर अवघ्या १२५ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने पाहुण्यांना दिलं. इंग्लंडने हा सामना ८ गडी राखून जिंकला. मात्र या सामन्यामधील भारताच्या के. एल. राहुलच्या क्षेत्ररक्षणाची चांगलीच चर्चा रंगली.

विशेष म्हणजे भारतीय फलंदाज ज्या खेळपट्टीवर चाचपडताना दिसत होते त्याच खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी जम बसवला आणि फटकेबाजी सुरु केली. वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकी गोलंदाजांचाही इंग्लंडच्या फलंदाजांनी समाचार घेतला. असाच एक प्रयत्न अक्सर पटेलच्या फिरकी गोलंदाजीवर जोस बटलरने केला उत्तुंग षटकार मारण्याचा नादात बटलरने चेंडू टोलवला. चेंडू अगदी षटकार जाणार असं वाटत असतानाच सीमेरेषेजवळ के. एल. राहुलने अफलातून क्षेत्ररक्षण करत सहा ऐवजी केवळ दोन धावा दिल्या.

के. एल. राहुलने चेंडूंचा अंदाज घेत योग्य वेळी उडी मारत चेंडू हवतेच झेलला आणि स्वत: सीमारेषेपलीकडे पडण्याआधी चेंडू पुन्हा मैदानात फेकला. राहुलची ही कामगिरी पाहून समालोचकांनाही त्याचं कौतुक केलं. आजच्या काळातील खेळाडूंची चपळता ही अफाट असते अशा शब्दांमध्ये समालोचकांनी राहुलची स्तुती केली. इंटरनेटवरही राहुलवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

रोहित शर्माऐवजी सलामीला आलेल्या राहुलला फलंदाजीमध्ये मात्र फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. चार चेंडूंमध्ये एक धावा करुन तो दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच तंबुत परतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 10:13 pm

Web Title: ind vs eng t 20 kl rahul amazing fielding leaves former india and england cricketers awestruck scsg 91
Next Stories
1 Ind vs Eng: भारतीय इनिंग ठरली ‘वन मॅन शो’; अर्ध्याहून अधिक धावांचे ‘श्रेय’ अय्यरलाच; पाहा आकडेवारी
2 Video: “हा तर क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम शॉट”; पंतचा षटकार पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार चक्रावला
3 CSK ट्रेनिंग कॅम्पमध्ये धोनीची तुफान फटकेबाजी; व्हिडीओ व्हायरल! IPL 2021 मध्ये माहीचा जलवा दिसणार?
Just Now!
X