Gujarat Titans beat Chennai Super Kings by 35 runs : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३५ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरातने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचवेळी चेन्नईच्या पराभवामुळे प्लेऑफची शर्यत रोमांचक बनली आहे. गुजरातच्या या विजयाने आरसीबीला प्लेऑफमध्येही जिवंत ठेवले आहे. प्रथम खेळताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ३ बाद २३१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ केवळ ८ बाद १९६ धावा करू शकला. गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतके झळकावली आणि त्यानंतर मोहित शर्मा आणि राशिद खान यांनी गोलंदाजीत कमाल केली. मोहितने ३ तर राशिदने २ बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली. कारण सीएसकेने पॉवरप्लेच्या षटकात ३ गडी गमावून ४३ धावा केल्या होत्या. येथून डॅरिल मिशेल आणि मोईन अली यांच्यात १०९ धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली. पुढच्या ६ षटकांत दोघांनी ७६ धावा जोडल्या. त्यामुळे १२ षटकांनंतर संघाची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावा झाली. दरम्यान, १३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिशेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ६३ धावा करून बाद झाला. मिशेलने ३४ चेंडूत सामना करताना ७ चौकार आणि ३ षटकार मारले. यानंतर १५व्या षटकात मोईन अलीही ५६ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ३६ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. अशा प्रकारे सीएसकेने १५ षटकात १४३ धावा केल्या होत्या आणि संघाला विजयासाठी शेवटच्या ५ षटकात ८९ धावांची गरज होती.

IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
MI beat SRH by 7 Wickets With Suryakumar Yadav Superb Century
IPL 2024: सूर्यकुमार यादवचे झंझावाती शतक हैदराबादवर पडलं भारी, मुंबई इंडियन्सने व्याजासकट घेतला बदला
RCB vs RR Rain Abandoned Match Who Will Play Qualifier 2
RCB vs RR एलिमिनेटर सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोणाला मिळणार क्वालिफायरची संधी? काय आहे IPL चा नियम?

हेही वाचा – GT vs CSK : साई सुदर्शनने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत रचला इतिहास, ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

१७व्या षटकात २१ धावा काढून शिवम दुबेही बाद झाला, पण रवींद्र जडेजा आज गोलंदाजांना चितपट करण्याच्या मूडमध्ये होता. दरम्यान, राशिद खानने १८व्या षटकात २ बळी घेत गुजरातचा विजय जवळपास निश्चित केला होता. परिस्थिती अशी होती की चेन्नईला विजयासाठी शेवटच्या षटकात ५२ धावा करायच्या होत्या. अखेरीस, धोनीने ११ चेंडूत २६ धावांची शानदार खेळी खेळली, परंतु बरेच प्रयत्न करूनही सीएसकेला ८ विकेट गमावून १९६ धावाच करता आल्या. या सामन्यात चेन्नईला ३५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा – IPL 2024 : “पार्ट्यांवर नव्हे तर क्रिकेटवर लक्ष द्यावे”, वसीम अक्रमचा भारताच्या ‘या’ युवा खेळाडूला महत्त्वाचा सल्ला

राशिद खानचे षटक ठरले सामन्याचे टर्निंग पॉइंट –

शेवटच्या ३ षटकात चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी ६४ धावांची गरज होती. राशिद खान १८व्या षटकात गोलंदाजी करायला आला. त्याने आपल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाला डेव्हिड मिलरकडे झेलबाद केले. जडेजाने १० चेंडूत १८ धावा केल्या. मिचेल सँटनरही षटकाच्या ५व्या चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला. यावेळी धोनी क्रीजवर असला तरी २ षटकात ६२ धावा करणे जवळपास अशक्य होते. या २ विकेट्ससह राशिद खानने जीटीचा विजय जवळपास निश्चित केला होता.

हेही वाचा – GT vs CSK : आयपीएलमध्ये ‘शतक शंभरी’; शुबमन गिल, साई सुदर्शनने झळकावली वेगवान शतकं

शुबमन गिल आणि साई सुदर्शनने लावली विक्रमांची रांग –

गुजरात टायटन्ससाठी शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी खेळली. गिलने ५५ चेंडूत १०४ धावा केल्या, ज्यात त्याने ९ चौकार आणि ६ षटकार मारले. दुसरीकडे, सुदर्शनने ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ७ षटकार आले. गिल-सुदर्शन ही आयपीएलच्या इतिहासात सामन्याच्या एका डावात शतके झळकावणारी तिसरी जोडी ठरली आहे. याशिवाय गिल आणि सुदर्शन यांनी आयपीएलच्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला. गिल आणि सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली. त्याच्या आधी २०२२ मध्ये क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली होती.