भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या सहभागावरून झालेल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. विश्वचषकादरम्यान संघाच्या सुरक्षेबाबत लेखी हमीच्या मुद्यावरून पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर जाण्यापासून थांबवण्यात आले आहे. विश्वचषकासाठी पाकिस्तानचा महिला संघ मंगळवारी दुपारी भारतासाठी रवाना होणार असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली. ‘‘सुरक्षेच्या मुद्यावरून भारतीय सरकारशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे महिला संघाचे प्रयाण लांबणीवर टाकण्यात आले आहे. महिला संघातील खेळाडूंच्या व्हिसाच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.

पाकिस्तानच्या सरकारतर्फे स्थापन केलेले त्रिसदस्यीय पथक सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतर विश्वचषकातील पाकिस्तान संघाच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पाकिस्तानचा पुरुष संघ विश्वचषकासाठी गुरुवारी रवाना होणार होता. मात्र सुरक्षा पथक अहवालाच्या पाकिस्तानच्या सरकारतर्फे स्थापन केलेले त्रिसदस्यीय पथक सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतात येणार आहे.कारणास्तव पुरुष संघाचे प्रयाणही लांबणीवर टाकण्यात आले आहे.