भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा आज शेवट झाला. अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडने 4 धावांनी मात करत मालिकेत 2-1 ने बाजी मारली. तर सकाळी हॅमिल्टनच्याच मैदानात भारतीय महिलांना पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या महिलांनी भारतीय महिलांवर 3-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मात्र एकाच दिवशी भारताच्या दोन्ही संघाना स्विकाराल्या लागलेल्या पराभवात एक अजब योगायोग जुळून आला आहे.

पुरुष आणि महिला संघाना अंतिम षटकात विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. मात्र दोघांपैकी एकालाही हे लक्ष्य पार करता आलेलं नाही. महिलांनी 16 पैकी 13 तर पुरुष संघाने 16 पैकी 11 धावा केल्या. कृणाल पांड्या आणि दिनेश कार्तिक यांच्याकडे आपल्या संघाची नौका पार करण्याची चांगली संधी होती मात्र तिचा फायदा घेणं त्यांना जमलं नाही. यानंतर भारतीय पुरुष संघासमोर ऑस्ट्रेलिया तर महिला संघासमोर इंग्लंडच्या संघाचं आव्हान असणार आहे.