क्रिकेटमध्ये पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागताना चेंडूवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन यंत्र मासाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी सांगितले
‘‘चेंडूवर लक्ष ठेवण्यासाठी एमआयटी आयसीसीला मदत करत आहे. जेव्हा हे यंत्र तयार होईल, तेव्हा स्वतंत्रपणे त्याची चाचणी केली जाईल. हे यंत्र चेंडूच्या अचूकतेबद्दल माहिती देईल. मी सध्या एमआयटीमध्येच व्याख्यानासाठी आलो आहे, इथे आल्यावर त्यांचे काम पाहून मी भारावून गेलो,’’ असे कुंबळे म्हणाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आयपीएलवरील निकालानंतर कुंबळे म्हणाला की, ‘‘माझ्यासाठी क्रिकेट हे सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा मोठे काहीही नाही.’’