07 July 2020

News Flash

बुंडेसलिगा फुटबॉल : सँचोच्या हॅट्ट्रिकमुळे डॉर्टमंड विजयी

अव्वल स्थानी असलेल्या बायर्न म्युनिकचे ६७ गुण आहेत.

संग्रहित छायाचित्र

जेडन सँचोच्या पहिल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बोरुसिया डॉर्टमंडने बुंडेसलिगा फुटबॉलमध्ये पॅडेरबॉर्नवर ६-१ असा मोठा विजय मिळवला. या बरोबरच डॉर्टमंडने लीगमधील त्यांचे दुसरे स्थान राखले.

गेल्या आठवडय़ात अव्वल स्थानावरील बायर्न म्युनिककडून डॉर्टमंडला पराभव पत्करावा लागला होता. मात्र पॅडेरबॉर्न या शेवटच्या स्थानी असलेल्या संघाविरुद्ध डॉर्टमंड सहज विजय मिळवणार हे अपेक्षित होते. इंग्लंडच्या २० वर्षीय सँचोने प्रभावी कामगिरी केली. डॉर्टमंडने या विजयासोबत ६० गुण मिळवले आहेत. अव्वल स्थानी असलेल्या बायर्न म्युनिकचे ६७ गुण आहेत.

ला-लिगाच्या सर्व खेळाडूंचा सराव सुरू

ला-लिगामधील सर्व क्लब्सच्या खेळाडूंनी सोमवारी सरावाला सुरुवात केली. ११ जूनपासून या स्पर्धेला पुन्हा प्रारंभ होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 4:01 am

Web Title: sanchezs hat trick helped dortmund win abn 97
Next Stories
1 कोहली धावांचा पाठलाग करण्यात सर्वोत्तम -स्मिथ
2 भारत-पाकिस्तान सामने व्हायलाच हवेत ! आणखी एका पाकिस्तानी खेळाडूने आळवला राग
3 “…म्हणून राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळायला जास्त आवडायचं”; इरफान पठाणचा खुलासा
Just Now!
X