भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदला जिब्राल्टर बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या फेरीत हंगेरीच्या झिदोनिया लाझार्न वाजदाने बरोबरीत रोखून अनपेक्षित धक्का दिला.
आनंदने या स्पर्धेत २३ वर्षांनी भाग घेतला आहे. स्लाव्ह बचाव तंत्राच्या डावात आनंदने सुरुवातीस खेळावर नियंत्रण मिळवले होते. डावाच्या शेवटी दोन्ही खेळाडूंकडे समान स्थिती होती. डावात विजय मिळवण्यासाठी संधी नाही हे लक्षात येताच आनंदने ४५व्या चालीला बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.