Hardik Pandya praises Gill-Jaiswal and bowlers : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने ९ गडी राखून विजय मिळवला. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. जैस्वालने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकार मारून नाबाद ८४ धावा केल्या, तर गिलने ४७ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ७७ धावा केल्या. तिलक वर्माने ७ धावांचे योगदान दिले. या दणदणीत विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या जुन्या चुकांबद्दल सांगितले.

आमच्या गोलंदाजांना मदत करावी लागेल –

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, “येथे भारतीयांची संख्या जास्त आहे. ते ज्या प्रकारे समर्थन करत आहेत, ते मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे मनोरंजन करणे हे कर्तव्य आहे. गिल आणि जैस्वालच्या कौशल्याबद्दल शंका नाही. पुढे जाऊन, आम्हाला फलंदाजी गट म्हणून जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि आमच्या गोलंदाजांना मदत करावी लागेल. गोलंदाज सामने जिंकतात. जर त्यांनी तुम्हाला काही विकेट्स मिळवून दिल्या तर तुम्ही खेळावर नियंत्रण ठेवू शकता.”

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: अंगक्रिश रघुवंशीच्या पहिल्या अर्धशतकाचे खास सेलिब्रेशन कोणासाठी केले? सामन्यानंतर सांगितले
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…

मी खेळाच्या हिशोबाने नेतृत्त्व करण्याचा प्रयत्न करतोय –

हार्दिक पांड्याने सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालचे कौतुक केले. तो म्हणाला, “शुबमन आणि यशस्वीची कामगिरी शानदार होती. या उन्हात ते ज्या प्रकारे धावले आणि त्यांनी काम पूर्ण केले. हे पाहणे सुखद होते. मी खेळाच्या हिशोबाने नेतृत्त्व करण्याचा प्रयत्न करतोय. मला माझ्या प्रवृत्तीनुसार पुढे जायला आवडते.”

हेही वाचा – IND vs WI 4th T20: यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलचा मोठा धमाका! रोहित-शिखरचा मोडला ‘हा’ विक्रम

हार्दिक पांड्याने मान्य केली आपली चूक –

पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय कर्णधाराने ही आमची चूक असल्याचे सांगितले. हार्दिक म्हणाला, “आम्ही दोन सामने हरलो पण पहिल्या सामन्यात आमचीच चूक होती. आम्ही खूप चांगले खेळत होतो, आम्ही शेवटच्या चार षटकांमध्ये चुका केल्या आणि आमच्या चुकांमुळे आम्हाला यश मिळू शकलं नाही. पुढच्या दोन सामन्यांमध्ये आम्ही फारशी वेगळी कामगिरी केली नाही. या सर्व सामन्यांमुळे आमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे.”

हेही वाचा – असामान्य क्रिकेटपटूमधील ‘साध्या माणसा’शी संवाद; बुधवारी ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये अजिंक्य रहाणे

आम्हाला कंबर कसावी लागली –

भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “आम्हाला कंबर कसावी लागली आणि चांगले क्रिकेट खेळावे लागले, युवा खेळाडूंनीही तेच केले. टी-२० क्रिकेटमध्ये कोणीही कोणाचे आवडते नसते. तुम्हाला मैदानात उतरून चांगले क्रिकेट खेळायचे असते. तुम्हाला समोरच्या संघाचा आदर करावा लागेल. आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळल्यामुळे ते २-० ने पुढे होते. उद्या आम्ही येऊ आणि आज जे केले ते करू आणि चांगल्याची आशा करू.”