Liton Das New Bangladesh ODI Captain: बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार तमिम इक्बाल याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर तमीम इक्बालने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर एका दिवसानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आता एकदिवसीय संघाची कमान लिटन दासकडे सोपवली आहे. लिटन दास आता अफगाणिस्तानविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेश संघाचे नेतृत्व करेल.

लिटन हा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू असून त्याने यापूर्वी कर्णधारपद भूषवले आहे. लिटन हा कसोटी सामन्यांचा कर्णधार आहे. तमिमच्या निवृत्तीच्या घोषणेनंतरच लिटनकडे वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले. तमिमने गुरुवारी पत्रकार परिषदेत राजीनामा जाहीर केला. यादरम्यान तो भावुक झाला. हा अचानक घेतलेला निर्णय नसल्याचे तमिमने म्हटले होते. याबाबत कुटुंबीयांशी चर्चा केली. तमिमच्या राजीनाम्यानंतर लिटन आता अफगाणिस्तानविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांचे नेतृत्व करणार आहे.

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर लिटन दास म्हणाला की, आम्हाला तमीम इक्बालची खूप आठवण येईल. लिटन म्हणाला की, जर मी जखमी झालो तर संघाला माझी तितकीच उणीव भासणार नाही जितकी आम्हाला त्यांची उणीव भासेल. हे क्रिकेट आहे आणि आपल्याला पुढे जायचे आहे. त्याचबरोबर युवा खेळाडू संघात येत आहेत. कधीतरी आपल्यालाही निघावं लागेल आणि सध्या तमीम आपल्यासोबत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त बोलणं योग्य नाही. तमिमने घेतलेला निर्णय आम्हा सर्वांसाठी अत्यंत धक्कादायक असल्याचे लिटनने सांगितले. तो असा निर्णय घेईल, अशी अपेक्षा एकाही खेळाडूला नव्हती.

हेही वाचा – MS Dhoni 42nd Birthday: ”…म्हणून माहीला फक्त ३० लाख रुपये कमवायचे होते”, माजी क्रिकेटपटू वसीम जाफरचा धोनीबद्दल मोठा खुलासा

बांगलादेशने तीन एकदिवसीय मालिकेतील पराभवाने सुरुवात केली. डकवर्थ लुईस नियमानुसार पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने १७ धावांनी पराभूत केले होते. आता या मालिकेतील दोन सामने बाकी आहेत. दुसरा सामना ८ जुलैला तर तिसरा सामना ११ जुलैला होणार आहे.