चौथ्या कसोटीत ख्वाजाचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश; ब्रॉडचे पुनरागमन

India T20 World Cup Squad Announced 2024 Marathi News
ICC T20 World Cup: संजू सॅमसन, शिवम दुबेला वर्ल्डकपचं तिकीट; हार्दिक पंड्या उपकर्णधार, टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर
Good news for LSG team Mayank Yadav available for match against Mumbai
Mayank Yadav : लखनऊसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी झाला फिट
Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा

सलग तीन सामने गमावल्यावर उर्वरित दोन लढतींमध्ये प्रतिष्ठा जपण्याच्या निर्धाराने इंग्लंडचे खेळाडू मैदानात उतरतील. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील चौथा अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामना बुधवारपासून सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. जायबंदी ट्रेव्हिस हेडच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाला संधी दिली असून जोश हेझलवूड अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने गेल्या लढतीचा सामनावीर स्कॉट बोलंडचे संघातील स्थान कायम आहे.

दुसरीकडे जो रूटने इंग्लंड संघात एक बदल केला असून दुखापतग्रस्त ओली रॉबिन्सनच्या जागी स्टुअर्ट ब्रॉडचे संघात पुनरागमन झाले आहे. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांना करोना झाल्याने ग्रॅहम थॉर्प इंग्लंडला मार्गदर्शन करणार आहेत.

सिडनी येथे नववर्षाच्या प्रारंभी होणारी कसोटी दरवर्षी ‘पिंक टेस्ट’ म्हणून ओळखली जाते आणि या लढतीद्वारे गोळा होणारा काही निधी माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्राची पत्नी जेनच्या स्मृतीप्रीत्यर्थ कर्करोग झालेल्या रुग्णांना देण्यात येतो.

’ वेळ : पहाटे ५ वा.

’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३