अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांची माहिती; त्रिसदस्यीय समितीद्वारे चौकशी
उत्तेजक घेतल्याची लेखी कबुली आंतरराष्ट्रीय धावपटू रोहिणी राऊतने दिली असून याबाबत त्रिसदस्यीय समितीद्वारे चौकशी केली जाईल, असे महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले. निष्क्रिय जिल्हा संघटनांवर भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या नियमावलीनुसार कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सुमारीवाला यांनी सांगितले की, ‘जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या नियमानुसार रोहिणीला दोन वर्षे स्पर्धात्मक अॅथलेटिक्समध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तिला याबाबत क्रीडा लवादापुढे आपली बाजू मांडण्याचीही संधी आहे, मात्र आपण उत्तेजक घेतल्याचे तिने लेखी पत्र आमच्याकडे पाठविले आहे. तरीही आम्ही राज्य संघटनेतर्फे याबाबत रीतसर चौकशी करणार आहोत. या समितीमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू व राज्य संघटनेचे सहसचिव शरद सूर्यवंशी यांचा समावेश असून, लवकरच समितीवरील वैद्यकीय तज्ज्ञ व वकिलाची नियुक्ती केली जाणार आहे. या समितीपुढे रोहिणी व तिच्या प्रशिक्षकांची चौकशी केली जाईल. समितीकडून अहवालानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.’
समांतर राज्य संघटनेबाबत सुमारीवाला यांनी सांगितले, ‘या संघटनेने आमच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. आजपर्यंत आमच्या संघटनेचा कारभार अतिशय पारदर्शी आहे. राज्य स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत काही जिल्हा संघटनांनी ऐन वेळी नकार दिल्यानंतर शिवछत्रपती क्रीडानगरीत राज्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची निवास व अन्य व्यवस्था राज्य संघटनेने करावी, अशी विनंती सर्वच जिल्हा संघटनांनी करीत त्यासाठी खर्च देण्याचेही मान्य केले. या व्यवस्थेसाठी रीतसर खर्च मागितला गेला तर ती गोष्ट गैर नाही. मात्र काही संघटकांनी राज्य संघटनेचे पदाधिकारी खेळाडूंच्या खर्चासाठी पैसे मागतात, असा आरोप आमच्यावर केला आहे.’
समातंर राज्य संघटनेच्या लेटरहेडवर ज्यांची नावे लिहिली आहेत त्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्याला न विचारताच आपली नावे अवैधरीत्या नोंदवली असल्याचे आम्हाला कळविले आहे, असे सांगून सुमारीवाला म्हणाले, ‘केवळ कायदेशीर कारवायांमध्ये आम्हाला गुंतवण्यातच या संघटकांना स्वारस्य वाटत आहे. ज्या जिल्हा संघटना नियमित स्पर्धा आयोजित करीत नाहीत, आर्थिक ताळेबंद तयार करीत नाहीत, रीतसर निवडणुका घेत नाहीत आदी विविध कारणास्तव या संघटनांवर बडतर्फीची कारवाई करण्याचा भारतीय अॅथलेटिक्स महासंघास अधिकार आहे. मात्र आम्ही त्यांच्यावर थेट कारवाई न करता स्वतंत्र समितीद्वारे त्यांची चौकशी करणार असून, राज्य संघटनेच्या सर्वसाधारण सभेत किंवा विशेष सभेत ठराव मांडून त्याद्वारे कारवाई करणार आहोत.’
राज्य संघटनेच्या निवडणुका बेकायदेशीर झाल्याचा आरोप फेटाळून लावत सुमारीवाला म्हणाले, ‘२०१३ मध्ये आमच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीच्या वेळी भारतीय अॅथलेटिक्स महासंघ, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निवडणुका नियमानुसारच झाल्या आहेत.’

students in 5th 8th failed in pune city
पाचवी,आठवीच्या अनुत्तीर्णांमध्ये शहरातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त
pune kidnap marathi news, 7 month old child kidnapped pune station
पुणे: अपहृत बालकाची तीन लाखांत विक्री, दोघांना अटक; सूत्रधार पसार
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका