Viral Video: राज्यात काल मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ जागांसाठी मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली, तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. यादरम्यान मतदान केंद्रावर रांगा पाहायला मिळतात. मतदान करणाऱ्या लोकांच्या असंख्य व्हिडीओपैकी गुजरातमधील एका व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. काय आहे या व्हिडीओत खास, चला या लेखातून पाहू.

गुजरातमधील एका व्यक्तीने चक्क पायाच्या बोटाने मतदान केल्याची माहिती समोर येत आहे. अंकित सोनी या मतदाराने त्याच्या पायाच्या बोटावर जांभळ्या-काळ्या रंगाची शाई लावलेलीसुद्धा दिसते आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेशी बोलताना अंकित सोनी या मतदाराने २० वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने दोन्ही हात कसे गमावले याची हृदयद्रावक घटना शेअर केली आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

Mahindra Scorpio Car Jugaad
नाद करायचा नाही! १७ लाखाच्या ‘या’ महिंद्राच्या ७ सीटर कारनं नांगरली शेती, ‘तो’ VIDEO पाहून आनंद महिंद्राही होतील चकित
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Indian Flag Disrespected On Kerala Road Rickshaw Riding on Tricolor Flag
भारतातच राष्ट्रध्वजाचा इतका अपमान? पाकिस्तानचा संबंध जाणून नेटकरी आणखीनच भडकले, नेमकं ‘त्या’ रस्त्यावर घडलं काय?
Delhi viral vada pav girl riding mustang car video
Video : ऐकावं ते नवलच! वडापाव विकून घेतली ‘एक कोटीची’ गाडी अन् आयफोन? दिल्लीची ‘फेमस वडापाव गर्ल’ पुन्हा चर्चेत!
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?

हेही वाचा…लेक माझी लाडकी! कर्करोगाशी झुंज देणाऱ्या चिमुकलीला पाहून आईचा कंठ आला दाटून; पाहा डोळे पाणवणारा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

आवश्यक कामे करण्यासाठी २० वर्षांपासून व्यक्ती आपले पाय वापरत आहे. पण, त्यांनी आपल्या अपंगत्वाला शिक्षण घेण्यापासून स्वतःला थांबवले नाही व यशस्वीरित्या एमबीए पदवीदेखील मिळवली. शिक्षण पूर्ण करण्यात त्यांच्या गुरुजींचा वा शिक्षकांचा मोलाचा वाटा होता. तसेच व्हिडीओच्या शेवटी, अंकित सोनी यांनी स्वतःचे कर्तव्य बजावण्याचे व इतर नागरिकांना घराच्या बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ANI यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “अंकित सोनी या मतदाराने मतदान केंद्रावर पायाच्या बोटांच्या सहाय्याने मतदान केले आहे”, अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण व्यक्तीचे कौतुक करत आहेत तर बरेच जण “इतरांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी तो ECI चा राजदूत असावा”; आदी अनेक कमेंट करताना नेटकरी दिसून येत आहेत. याअगोदरदेखील आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व मतदारांच्या मतदान जागरुकतेला चालना देण्यासाठी चेन्नईतील स्कूबा डायव्हर्सच्या एका ग्रुपने ‘अंडर वॉटर वोटिंग अव्हेरनेस’ हा अनोखा उपक्रम राबवला होता. तर आज या व्यक्तीने पायाने मतदान करून एक उत्तम उदाहरण जगापुढे ठेवलं आहे.