ब्रिस्बन : ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज रॉडनी मार्श यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या गुरुवारी क्वीन्सलंड येथे धर्मादाय संस्थेच्या एका कार्यक्रमादरम्यान मार्श यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी मार्श यांनी अ‍ॅडलेड येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

मार्श यांची ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यांनी १९७० ते १९८४ या कालावधीत ९६ कसोटी आणि ९२ एकदिवसीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल (३४३) पकडण्याचा विक्रम अनेक वर्षे त्यांच्या नावे होता. त्यांनी १२ फलंदाजांना यष्टिचीतही केले. मार्श आणि डेनिस लिली ही यष्टीरक्षक-वेगवान गोलंदाजाची जोडी अतिशय यशस्वी ठरली. मार्श यांनी लिली यांच्या गोलंदाजीवर विक्रमी ९५ झेल टिपले.

Jason Gillespie Gary Kirsten
कर्स्टन, गिलेस्पी पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक
jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Tom Latham believes that Test cricket is the most important sport news
कसोटी क्रिकेटच सर्वांत महत्त्वाचे टॉम लॅथम
Dipendra Singh Airee Sixes Video
Dipendra Singh Airee : ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत नेपाळच्या फलंदाजाने कतारच्या गोलंदाजाला फोडला घाम, पाहा VIDEO

तसेच डावखुऱ्या मार्श यांनी फलंदाजीतही आपली चमक दाखवली. त्यांनी ९६ कसोटी सामन्यांच्या १५० डावांत तीन शतके आणि १६ अर्धशतकांच्या साहाय्याने ३६३३ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे ते ऑस्ट्रेलियाचे पहिले यष्टीरक्षक-फलंदाज ठरले. १९८५ मध्ये त्यांना क्रीडा ऑस्ट्रेलियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान लाभले.      क्रिकेट खेळण्यातून निवृत्त झाल्यावर मार्श यांनी प्रशिक्षक आणि प्रशासकाचीही भूमिका बजावली. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील राष्ट्रीय अकादमींचे अध्यक्षपद भूषवले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक प्रशिक्षण अकादमीचे ते पहिले प्रमुख होते. २०१४ मध्ये त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी ऑस्ट्रेलियन निवड समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली होती.