जगातील अग्रगण्य टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. जोकोव्हिचला वैद्यकीय सूट मिळाली असून पुढील काही दिवसांतच तो मेलबर्नला रवाना होणार आहे.

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेला १७ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू, पदाधिकारी आणि प्रेक्षकांना लसीकरण अनिवार्य आहे. परंतु गतविजेत्या जोकोव्हिचने आतापर्यंत एकदाही करोना प्रतिबंधक लस घेतल्याचा पुरावा सादर केलेला नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या स्पर्धेतील समावेशाबाबत संभ्रम कायम होता. अखेर मंगळवारी ‘इन्स्टाग्राम’वर टाकलेल्या पोस्टमध्ये जोकोव्हिचने स्वत:च या संदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

‘‘तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या जवळच्या व्यक्तींसह गेले काही दिवस वेळ घालवल्यानंतर वैद्यकीय सूट मिळाल्याचा पुरावा घेत मी आगामी टेनिस स्पर्धांसाठी सज्ज होत आहे,’’ असे जोकोव्हिचने पोस्टमध्ये नमूद केले. ३४ वर्षीय जोकोव्हिचला यंदा विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम मिळवण्याची संधी असून सध्या तो, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या नावावर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.

जोकोव्हिचने सध्या सिडनीत सुरू असलेल्या एटीपी चषक टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र आता जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळाल्याने अन्य स्पर्धक, टेनिसप्रेमींकडून आयोजकांवर टीका होत आहे.