ला-लीगा फुटबॉल अॅटलेटिको माद्रिदने महत्त्वपूर्ण सामन्यात एल्चे संघावर १-० असा निसटता विजय मिळवत ला-लीगा फु टबॉलमध्ये दोन गुणांची आघाडी कायम ठेवली आहे. या विजयासह अॅटलेटिको माद्रिदने ३४ सामन्यांत ७६ गुणांसह अग्रस्थान कायम राखले आहे. रेयाल माद्रिदने ओसासुनावर २-० असा विजय मिळवला असला तरी ते ३४ सामन्यांत ७४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे पुढील चार साखळी सामन्यांत जेतेपदाची चुरस अधिक तीव्र होत जाणार आहे. मार्कस लॉरेंटे याने २३ व्या मिनिटाला अॅटलेटिकोला आघाडी मिळवून दिल्यानंतर एल्चेला भरपाई वेळेत पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आले. एडेर मिलिटाओ (७६व्या मिनिटाला) आणि कॅ सेमिरो (८०व्या मिनिटाला) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानामुळे रेयाल माद्रिदला विजय मिळवता आला.