Ajit Agarkar said about KL Rahul and Rinku Singh : बीसीसीआयने ३० एप्रिल रोजी टी-२० विश्वचषक २०२४ साठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. या संघात रिंकू सिंग आणि केएल राहुल संधी मिळाली नाही. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांची निवड का करण्यात आली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. यावर आता मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीच कारण सांगितले आहे. अजित आगरकरशिवाय कर्णधार रोहित शर्मानेही सांगितले की, संघाची निवड केवळ आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आलेली नाही. आयपीएलपूर्वीही ७० टक्के संघ निवडला गेला होता.

केएल राहुलने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १० सामन्यांमध्ये ४० पेक्षा जास्त सरासरीने ४०६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रिंकू सिंगने गेल्या वर्षी पदार्पण केल्यानंतर भारतीय संघासाठी ८९ च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. आता पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी राहुल आणि रिंकूची निवड न करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

West Indies Cricketer Devon Thomas Banned For 5 Years by ICC
वेस्ट इंडिजच्या स्टार फलंदाजावर आयसीसीने घातली ५ वर्षांची बंदी, मॅच फिक्सिंगसह ७ मोठे आरोप झाले सिद्ध
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Ajit Agarkar's reaction to Virat's strike rate
T20 WC 2024 : विराटच्या स्ट्राइक रेटबद्दल विचारताच हिटमॅनला आले हसू, तर अजित आगरकर म्हणाले…
Hardik Pandya Statement on MI defeat to KKR
IPL 2024: “आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही…” मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पंड्या नेमकं काय म्हणाला?
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
India T20 World Cup Squad Announced 2024 Marathi News
ICC T20 World Cup: संजू सॅमसन, शिवम दुबेला वर्ल्डकपचं तिकीट; हार्दिक पंड्या उपकर्णधार, टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर

केएल राहुलची निवड का झाली नाही?

केएल राहुलची निवड न करण्याबद्दल मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, “केएल राहुल हा उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु आम्हाला मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करू शकेल अशा फलंदाजाची गरज होती. राहुल सध्या आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी सलामी देत ​​आहे. हा निर्णय त्या आधारावर घेण्यात आला आहे, ज्या स्थानावर फलंदाजीसाठी जागा रिक्त होती. आम्हाला असे वाटले की ऋषभ पंत आणि संजू सॅमसन डावाच्या उत्तरार्धात फलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात. त्यामुळे या दोघांची निवड करण्यात आली आहे.”

हेही वाचा – T20 WC 2024 : विराटच्या स्ट्राइक रेटबद्दल विचारताच हिटमॅनला आले हसू, तर अजित आगरकर म्हणाले…

रिंकू सिंगबद्दल अजित आगरकर काय म्हणाले?

रिंकू सिंगबद्दल आगरकर म्हणाले, “आम्हाला रिंकू सिंगबाबत खूप विचार करावा लागला आणि कदाचित आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही आणि शुबमन गिलनेही काही चुकीचे केलेले नाही. हे सर्व संयोजनावर अवलंबून असते. आता आमच्याकडे दोन मनगटी फिरकी गोलंदाज आहेत, त्यामुळे रोहितकडे आणखी पर्याय असतील. त्यामुळे याला दुर्दैव म्हणता येईल. रिंकूला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे, यावरून तो १५ खेळाडूंच्या संघात स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ होता. शेवटी आम्ही फक्त १५ खेळाडूच निवडू शकतो.”

हेही वाचा – T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याच्या निवडीवर अजित आगरकरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “तो जे करु शकतो त्याचा…”

टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवराज चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.