T20 World Cup 2024: आठ महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर हार्दिक पंड्या भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून टी-२० विश्वचषकामध्ये खेळताना दिसणार आहे. ३० एप्रिलला बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला, ज्यामध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि हार्दिक पंड्याला उपकर्णधार पद देण्यात आले आहे. पंड्याने वनडे वर्ल्डकपमधील दुखापतीनंतर आयपीएलमधून पदार्पण केले. आयपीएलमधील सध्याचा पंड्याचा फॉर्म पाहता त्याला उपकर्णधार बनवले याबाबत माजी निवडकर्ता एसएसके प्रसाद यांच्या वक्तव्यानेही सर्वांना आश्चर्य झाले आहे.

हार्दिकला उपकर्णधारपद दिल्याने अनेकांना आश्चर्य झाले पण बीसीसीआयचे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद यांच्यासाठी ही स्वाभाविक गोष्ट होती. याबद्दल वक्तव्य देताना त्यांनी पंड्याची पाठराखण करत इतरांना एक प्रश्न विचारला आहे.

सध्या हार्दिकपेक्षा चांगला वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू कोण आहे?

प्रसाद यांनी RevSportz शी संवाद साधताना सांगितले, “मला वाटत नाही की हार्दिकच्या समावेशाबाबत आणि संघाचा उपकर्णधार बनवण्याबाबत फार काही विचार केला गेला आहे. रोहित नसताना त्याला कर्णधारपद देण्यात आले होते. त्यामुळे हे स्पष्ट होतं की रोहितनंतर नेतृत्त्वाची जबाबदारी पंड्यावर असेल. निवडकर्त्यांनी त्याची निवड करून योग्य निर्णय घेतला आहे. मला सांगा, सध्या देशात हार्दिकपेक्षा चांगला वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू कोण आहे?

हेही वाचा – T20 World Cup मधील टीम इंडियाचे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता खेळवले जाणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

“होय, सध्याच्या घडीला हार्दिक फॉर्मशी झगडत आहे. पण सध्या बरंच काही घडलं आहे त्यामुळे आपण fair राहूया. मुंबई इंडियन्समधील नेतृत्व बदलाचा दुर्दैवाने त्याच्या फॉर्मवरही परिणाम झाला आहे. पण एकदा का त्याने भारतीय जर्सी घातली की तो त्याचा आयपीएल फॉर्म मागे टाकेल आणि मी पुन्हा एकदा सांगतो की हार्दिक पांड्या हा देशातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. यावर कोण काय बोलतं याने काही फरक पडत नाही.

IPL 2024 मध्ये हार्दिकच्या शानदार पुनरागमनाची अपेक्षा होती. कारण म्हणजे त्याला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण २४ मार्च ते १ मे दरम्यान पंड्या आणि मुंबई इंडियन्सला अपयशाला सामोरे जावे लागले आहे. एक पराभव आणि मुंबईचे यंदाच्या आयपीएल जेतेपदाचे स्वप्नही भंगणार आहे. पंड्याने आयपीएल २०२४ मध्ये १९७ धावा करत सहा विकेट्स मिळवल्या आहेत.

हेही वाचा- T20 WC 2024: “५ तारखेला मॅच आहे, आताच सांगून काय करू?” रोहितचे पत्रकार परिषदेत भन्नाट उत्तर, वाचा नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हार्दिक या सगळ्यातून नक्कीच बाहेर येईल. रोहित-हार्दिक दोघेही वर्ल्डकपमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी करतील, याची मला खात्री आहे. भारतीय संघात आल्यानंतर या दोघांच्याही भूमिका बदलणार आहेत. मुंबई इंडियन्समध्ये, भूमिका स्पष्ट नसल्याने हार्दिक संघर्ष करत आहे. गुजरात टायटन्समध्ये, त्याला सोपवण्यात आलेली भूमिका स्पष्ट होती. पण अचानक मुंबई इंडियन्समध्ये आल्यावर जिथे अनेक सुपरस्टार्स खेळाडू आहेत, तिथे तो एक परिपूर्ण फलंदाजी ऑर्डर तयार करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे, यामुळे त्याच्या भूमिकेत स्पष्टता दिसत नाही. त्याला भारतीय संघात या गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही,” असे निवड समितीचे माजी अध्यक्ष म्हणाले.