Babar Azam’s opinion on ipl and bbl: बाबर आझम सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये पेशावर झाल्मीचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत बाबरने आयपीएल आणि बीबीएलमधील त्याची आवडती लीग निवडली आहे. बाबर म्हणाला की त्याला आयपीएल आणि बीबीएल पैकी बिग बॅश लीग (बीबीएल) आवडते. क्रिकेट पाकिस्तानने ट्विटरवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये बाबर आपली निवड करताना दिसला.

ऑस्ट्रेलियात परिस्थिती वेगळी आहे –

बाबर यांनी बीबीएल निवडण्यामागील त्यांचे कारणही स्पष्ट केले. तो म्हणाला, ऑस्ट्रेलियातील परिस्थिती वेगळी आहे. तेथील खेळपट्ट्या खूप वेगवान आहेत. तसेच तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. तर आयपीएलमध्ये तुम्हाला तीच आशियाई परिस्थिती मिळते.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या ड्राफ्टमध्ये नाव नोंदवले गेले –

बाबर अद्याप बिग बॅश लीगमध्ये सहभागी झालेला नाही, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे स्पर्धेच्या पहिल्या सत्रापासून आयपीएलमध्ये कोणताही पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळलेला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला बाबर आझमने २०२३ च्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या ड्राफ्टमध्ये आपले नाव नोंदवले. त्याने एक लाख पाऊंडच्या राखीव किंमतीसह ड्राफ्टमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा – Saqlain Mushtaq: सचिन तेंडुलकरला स्लेजिंग करणं मला पडलं महागात, कारण… पाकिस्तानच्या माजी खेळाडूने केला खुलासा

बाबरने ५२.०० च्या सरासरीने ४१६ धावा केल्या आहेत –

बाबर आझमने पीएसएल २०२३ च्या ९ सामन्यांमध्ये ५२.oo च्या सरासरीने ४१६ धावा केल्या आहेत. बाबरने १ शतक आणि ४ अर्धशतके केली आहेत. पाकिस्तान सुपर लीग २०२३ च्या एलिमिनेटरमध्ये गुरुवारी इस्लामाबाद युनायटेडचा सामना पेशावर जाल्मीशी होणार आहे.

आयपीएल ही जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत टी-२० लीग मानली जाते. मात्र, आयपीएलच्या पहिल्या सत्रानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा प्रवेश बंद आहे. आयपीएल २००८ हा एकमेव हंगाम होता, ज्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूही सहभागी झाले होते. मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा प्रवेश बंद आहे. अशा परिस्थितीत बाबर आझमसारख्या पाकिस्तानी खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

हेही वाचा – Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा! म्हणाला, ‘… म्हणून आरसीबीचे कर्णधारपद सोडले’

दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीग ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सची लढत चार वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. दोन्ही संघांना आयपीएल २०२३ च्या सुरुवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी करायची आहे.