Rishi Sunak’s Statement on Australia’s Sports Spirit: पाच कसोटी सामन्यांची ॲशेस मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळली जात आहे. आतापर्यंत या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटीत बराच गदारोळ पाहिला मिळाला. मिचेल स्टार्कच्या झेलपासून ते जॉनी बेअरस्टोच्या रनआऊटपर्यंत बरेच वाद पाहिला मिळाले. मात्र सर्वात जास्त चर्चा जॉनी बेअरस्टोच्या रनआऊटची होत आहे. यावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही ते प्रिन्स विल्यम्ससोबत लॉर्ड्सच्या बाल्कनीतून सामन्याचा आनंद लुटताना दिसले. मात्र त्यांच्या उपस्थित ऑस्ट्रेलियाने इंग्लडचा ४३ धावांनी पराभव केला. जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या यादीत ऋषी सुनकचेही नाव जोडले गेले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्याने पत्रकारांना सांगितले की, “जॉनी बेअरस्टोची विकेट खेळाच्या भावनेनुसार नव्हती. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या पाठीशी पंतप्रधान उभे आहेत. तसेच स्टोक्सने सांगितले होते की, त्याला ऑस्ट्रेलियाप्रमाणे कोणताही सामना जिंकायला आवडणार नाही. या विधानाचे पंतप्रधानांनी समर्थन केले.” तसेच मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी केलेल्या लाँग रूम गैरवर्तनाचा देखील सुनक यांनी निषेध केला.

हेही वाचा –T20 Blast Tournament: जोस बटलरने हवेत उडी मारत एका हाताने टिपला जबरदस्त झेल, VIDEO होतोय व्हायरल

शनिवारी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा एमसीसीच्या सदस्यांकडून त्याला मिळालेला स्टँडिंग ओव्हेशन “खेळ भावनेला” अनुसरून असल्याचे सुनक यांचे मत होते. सुनक क्रिकेटला मुख्य राजकीय मुद्दा म्हणून पाहत नाही. स्टोक्सच्या १५५ धावा खेळीनंतर सुनक यांच्या प्रवक्त्याने सांगितले, “या सामन्यात बेन स्टोक्सने सर्वोत्तम कामगिरी केली आणि हा एक अविश्वसनीय कसोटी सामना होता. त्यांना विश्वास आहे की इंग्लंड हेडिंग्ले येथे पुनरागमन करेल.”

जॉनी बेअरस्टोचे काय आहे प्रकरण?

खरं तर, इंग्लंडच्या डावातील ५२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने कॅमेरून ग्रीनचा शॉर्ट बॉल मागे सोडला होता. यानंतर, बेअरस्टो लगेच क्रीझच्या बाहेर गेला, जेव्हा चेंडू डेड झाला झाला नव्हता आणि यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने तो आपल्या ग्लोव्हजमध्ये पकडला आणि स्टंपच्या दिशेने परत फेकला, ज्यामुळे बेल्स विखुरल्या आणि ऑस्ट्रेलिया संघाने आऊटची अपील केली. यानंतर थर्ड अंपायरने जॉनीला आऊट घोषित केले.