South Africa squad announced for T20 World Cup 2024 : आयपीएलच्या १७व्या हंगामानंतर १ जूनपासून आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी सर्व देश आपापले १५ सदस्यीय संघ जाहीर करत आहेत. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेने टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे. १५ सदस्यीय संघाव्यतिरिक्त तीन राखीव खेळाडूंचाही समावेश केला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघाची धुरा एडन मार्करमच्या खांद्यावर सोपवली सोपवली आहे. विशेष म्हणजे आयपीएल २०२४ मध्ये सहभागी असलेल्या जवळपास सर्व दक्षिण आफ्रिकने खेळाडूंना विश्वचषकासाठी संघात स्थान मिळाले आहे.

आयपीएल २०२४ मध्ये डंका वाजवणाऱ्या खेळाडूंची विश्वचषकासाठी निवड –

दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एडन मार्करम आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. त्याने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर लखनऊ सुपर जांयट्सकडून खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकची बॅटही आग ओकत आहे. तसेच गेराल्ड कोएत्झी हा मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. हेनरिच क्लासेननेही सनरायझर्स हैदराबादला विक्रमी धावसंख्या उभारण्यासाठी हातभार लावला आहे. फिरकी गोलंदाज केशव महाराज गुणतालिकेत नंबर वन असणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. डेव्हिड मिलर मागील सामन्यात गुजरात टायटन्ससाठी वादळी अर्धशतक झळकावले होते. वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा पंजाब किंगच्या गोलंदाजीचे नेतृत्त करत आहे. त्याचबरोबर ट्रिस्टन स्टब्स हा दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीचा महत्त्वाचा घटक आहे.

IND vs USA Match Updates in Marathi
IND vs USA : भारताविरूद्धच्या सामन्यातून अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलचं बाहेर, समोर आले महत्त्वाचे कारण
Gerhard Erasmus Took 17 Balls to Scored 1 Run Unwanted Record in History of T20 Cricket
ऑस्ट्रेलियामुळे ‘या’ संघाच्या कर्णधाराच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला हा प्रकार
BCCI announced the schedule of Ranji tournament Vidarbha in Group B for Tournament
रणजी स्पर्धेसाठी विदर्भ ‘ब’ समूहात, ‘या’ संघाशी होणार सामना…
Virat's Reaction to T20 World Cup in America
T20 WC 2024 : “मी कधीही विचार केला नव्हता की…”, अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर विराट कोहलीचे मोठे वक्तव्य
USA Denies Sandeep Lamichhane Visa
T20 WC 2024 : ‘या’ स्टार खेळाडूचं विश्वचषक खेळणं कठीण, अमेरिकेने व्हिसा देण्यास दिला नकार, काय आहे प्रकरण?
IPL 2024 Prize money updates in marathi
IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस
Lookman hat trick in Europa League football final sport news
लेव्हरकूसेनचे अपराजित्व संपवत अटलांटा अजिंक्य; युरोपा लीग फुटबॉलच्या अंतिम लढतीत लुकमनची हॅट्ट्रिक
pv sindhu
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; अश्मिताचा तिसऱ्या मानांकित झँगला धक्का

दक्षिण आफ्रिका संघाने दोनदा गाठलीय उपांत्य फेरी –

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत ४० सामने खेळले आहेत, त्यापैकी २४ जिंकले आहेत आणि १५ सामने गमावले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एकदाही फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी झालेला नाही. आफ्रिकेचा संघ २००९ आणि २०१४ मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता. यावेळी हा विक्रम बदलण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळल्यानंतर आफ्रिकन संघाला ८ जूनला नेदरलँड्सविरुद्ध, तर १० आणि १४ जूनला बांगलादेश आणि नेपाळविरुद्ध सामने खेळायचे आहेत.

हेही वाचा – “शुबमन गिल तुझ्यामुळे आउट होतोय”; चाहतीच्या ‘त्या’ VIDEO तील कृत्यांवर भडकले नेटिझन्स; म्हणाले, “स्वप्न…”

टी-२० विश्वचषक २०२४ साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:

एडन मार्करम (कर्णधार), ओटिनेल बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, बायरन फॉर्च्यून, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नोरखिया, कागिसो रबाडा, रायन रिक्लेटन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.