Shubman Gill Fan Girl:  क्रिकेटर्सची फॅन फॉलोइंग कोणापासूनही लपून राहिलेली नाही. आजच्या काळात क्रिकेटपटूंनाही चित्रपट कलाकारांप्रमाणे लोकप्रियता मिळताना दिसते. त्यात क्रिकेटर्समधील प्रिन्स म्हटल्या जाणाऱ्या शुबमन गिलची चांगली फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सध्या शुबमन अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अनेक तरुणी त्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी म्हणून स्टेडियममध्ये पोहोचतात. सध्या अशीच एक सुंदर तरुणी; जी गिलचा आयपीएल २०२४ मधील प्रत्येक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते. मात्र, स्टेडियमवर पोहोचल्यानंतर ती शुबमनचं लक्ष विचलित करण्यासाठी ज्या काही गोष्टी करतेय, ते पाहून नेटिझन्सनी संताप व्यक्त केलाय.

तरुणी लाइव्ह सामन्यात शुबमनच्या नावानं ओरडत त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करते. शैनी जेतानी, असे या तरुणीचे नाव असून, तिचे इन्स्टाग्रामवर खूप फॉलोअर्स आहेत. अनेक दिवसांपासून ती सोशल मीडियावरही ट्रेंड होतेय; पण ती गिलची फॅन असल्याने तिला आता लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

शुबमन गिलचे लक्ष वेधण्यासाठी चाहतीचे प्रयत्न

जर तुम्ही शैनी जेतानीचं इन्स्टा अकाउंट ओपन केलं, तर तुम्हाला गुजरात टायटन्स सामन्याशी संबंधित अनेक व्हिडीओ दिसतील. शैनी गुजरात टायटन्सचा प्रत्येक सामना पाहायला जाते आणि त्या सामन्यात अधूनमधून गिलचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा तिचा प्रयत्न असतो. अलीकडेच ती गिलचं लक्ष वेधण्यात यशस्वी झाली; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरात टायटन्सच्या प्रत्येक सामन्यात ती खास शुबमन गिलला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते. कधी ती गिलला फ्लाइंग किस देताना दिसते, कधी ती ओरडून त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. काही व्हिडीओंत ती गिलला पाहून स्टेडियममध्ये आनंदानं नाचताना दिसतेय.

गर्लफ्रेंडच्या नावात सात अक्षरे नसल्याने बॉयफ्रेंडने उचलले मोठे पाऊल? PHOTO पाहून युजर्स म्हणाले, “धोनीचा असा चाहता…”

एकदा तर ती अशा प्रकारे शुबमन गिलचं लक्ष वेधून घेतानाही दिसली. मात्र, आता काही लोकांना तिचं हे कृत्य अजिबात आवडलेलं नाही. ती अशा प्रकारे गिलचं लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात त्याचं लक्ष सामन्यातून विचलित करीत आहे, असं मत काहींनी व्यक्त केलंय.

View this post on Instagram

A post shared by Shaini Jetani (@shainijetani.9)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणीच्या या व्हिडीओंवर लोकांनी कमेंट्स करीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकानं लिहिलं की, शैनीमुळे गिल रन काढू शकत नाही, तो लवकर आऊट होतोय. तर दुसऱ्या एकानं लिहिलं की, शुबमन गिल तिला भावपण देणार नाही. तिसऱ्या एकानं, अशाच प्रकारे करीत राहा, एक दिवस तुझं स्वप्न पूर्ण होईल, असं लिहिलं आहे. अशा प्रकारे अनेकांनी तरुणीचं वागणं अतिशय विचित्र असल्याचं म्हटलं आहे. तसेच गिल आऊट होण्यासाठी हीच जबाबदार असल्याचं काहींचं मत आहे.