वृत्तसंस्था, चेन्नई : पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदवर मात करत चॅरिटी चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच या विजयासह कार्लसनने गेल्या महिन्यात एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षीय प्रज्ञानंदकडून झालेल्या पराभवाची परतफेडही केली. चॅरिटी चषक स्पर्धेतील सामन्यात काळय़ा मोहऱ्यांसह खेळणाऱ्या कार्लसनने सुरुवातीपासून वर्चस्व प्रस्थापित केले. त्याला प्रत्युत्तर देणे प्रज्ञानंदला शक्य झाले नाही आणि ४३ चालींअंती कार्लसनने विजयाची नोंद केली. त्यानंतर प्रज्ञानंदने शेवटून दुसऱ्या फेरीत विश्वचषक विजेत्या यान-क्रिस्टॉफ डूडाला पराभूत करण्याची किमया साधली. मात्र अखेरच्या फेरीत त्याला स्पेनच्या डेव्हिड अ‍ॅन्टोनकडून पराभव पत्करावा लागल्याने तो बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला.

Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
d. gukesh
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेशची विदितवर मात
R Pragyanand and Vidit Gujarathi
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंद, विदितचे चमकदार विजय
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत